आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

८० फुटांवरून पडलेली तरुणी झाडांमुळे बचावली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दौलताबाद किल्ला पाहण्यासाठी गेलेली १८ वर्षीय तरुणी पाय घसरून पडल्याने जखमी झाली. ही घटना मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली. किल्ल्यावरील कर्मचाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने तिला घाटीत दाखल केले असून तिची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. देवयानी अशोक पंजाबी (१८, रा. मुकुंदवाडी) असे जखमी युवतीचे नाव असून ती वसंतराव नाईक महाविद्यालयाची विद्यार्थिनी असल्याचे समजते.
दुपारी अडीचच्या सुमारास देवयानी ही दौलताबाद किल्ल्याच्या बारादरी जवळील बिजली दरवाजातून खाली पडली, अशी माहिती सहायक संरक्षक संजय रोहनकर यांनी दौलताबाद पोलिसांना दिली. देवयानी पडल्याचे पाहून सहलीवर आलेल्या शाळकरी मुलांनी आरडा ओरड केली. किल्ल्यावरील सुरक्षा रक्षकांनी स्ट्रेचरवरून सुमारे ३०० पायऱ्या उतरून खाली आणले घाटीत दाखल केले. घटनेची माहिती कळताच देवयानीच्या कुटुंबानी घाटीत धाव घेतली. ती महाविद्यालयात गेली होती. रोज ती अडीच वाजता घरी परतते. मात्र मंगळवारी ती या वेळेला घरी आली नव्हती. शोधाशोध सुरू केल्यावर पोलिसांकडून घटनेची माहिती मिळाली, असे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले. दरम्यान, सीटी स्कॅन, एमआरआय आदी चाचण्या केल्यानंतर तिला घरी जाण्याची परवानगी डॉक्टरांनी दिली.

झाडांमुळे बचावली
देवयानीबिजली दरवाजापासून सुमारे ८० फूट खाली पडली होती. पाय घसरल्यानंतर ती पाच ते दहा फूट खाली आदळली आणि झाडांत अडकत अडकत ती ८० फूट खाली आली. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून हात पायांना जखमा झाल्या आहेत.
बातम्या आणखी आहेत...