आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Head Of The Department Ayuktalaya Front Worker

विभागीय आयुक्तालयावर माथाडी कामगारांचा मोर्चा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद-माथाडी कामगारांवरील अन्याय दूर होण्याची चिन्हे दिसत नाहीत. शासनाने वेळीच मागण्यांकडे लक्ष दिले नाही, तर आता टोकाचा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा मराठवाडा लेबर युनियनच्या वतीने मोर्चाद्वारे देण्यात आला.
माथाडी कामगार कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी मराठवाडा लेबर युनियनच्या वतीने मंगळवारी विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात आला. क्रांती चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली. जोरदार घोषणाबाजी करत हा मोर्चा दुपारी विभागीय आयुक्तालयावर धडकला.
यात राज्य हमाल-मापाडी महामंडळाचे उपाध्यक्ष सुभाष लोमटे, लेबर युनियनचे सरचिटणीस अँड. सुभाष गायकवाड, देविदास कीर्तिशाही, प्रवीण सरकटे, अरविंद बोरकर, अली खान, फरीद पठाण, रंगनाथ खरे, र्शीराम चोरमले, भगवान धर्मे सहभागी झाले होते. येथे मान्यवरांची भाषणे झाली. तेव्हा सर्वांनीच आता टोकाचा निर्णय घेण्याची वेळ आल्याचे म्हटले असून येत्या काही दिवसांत शासनाने मागण्या मान्य केल्या नाही, तर आंदोलन तीव्र करण्याचे म्हटले आहे.