आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाट्यशास्त्राचा अभ्यासक्रम शालेय स्तरावर सुरू करावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - नाट्यशास्त्रहा व्यक्तिमत्त्व विकासासाठी महत्त्वाचा विषय असून तो शासनाने माध्यमिक शाळेपासूनच सुरू केला पाहिजे, असे मत अभिनेते संजय सुगावकर यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागाच्या ४१ व्या एकांकिका महोत्सवाचे उद्घाटन विभागाचे माजी विद्यार्थी प्रसिद्ध अभिनेते संजय सुगावकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी नाट्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. शशिकांत बऱ्हाणपूरकर होते. संजय सुगावकर म्हणाले की, रंगभूमीवर आपली छाप पाडण्यासाठी कलावंतांनी मेहनत केली पाहिजे. नाट्यशास्त्र विभागातून चांगले कलावंत घडावेत आणि नाहीच घडले तर निदान चांगले प्रेक्षक घडावेत एवढी माफक अपेक्षा आहे. कलाक्षेत्रात कुणी पहिल्याच प्रयत्नात "स्टार’ होतो, तर कुणी आयुष्यभरही स्टार होत नाही. म्हणून या क्षेत्राकडे फार डोळसपणे पाहण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

याप्रसंगी डॉ. शशिकांत बऱ्हाणपूरकर म्हणाले की, काही विद्यार्थ्यांनी स्वत: लिहिलेल्या एकांकिकेचे सादरीकरण होण्यासाठी त्यांना त्यांच्या लिखाणातील दिग्दर्शनातील उणिवा भरून काढण्याची संधी प्राप्त व्हावी यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्््घाटनानंतर प्रवीण पाटेकर लिखित संदीप कणके दिग्दर्शित "कॉमन लाइफ’ एकांकिकेचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमास डॉ. जयंत शेवतेकर, डॉ.अशोक बंडगर, प्रा.स्मिता साबळे, प्रा.गजानन दांडगे, रामदास ठोके, प्रा.सुमेध साळवे, प्रा.गणेश शिंदे, प्रा.विशाखा शिरवाडकर यांच्यासह रसिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार नाट्यनिर्देशक सुनील टाक यांनी केले.

२१ एकांकिकांचे सादरीकरण
या महोत्सवात २५ जानेवारीपर्यंत नाट्यशास्त्र विभागाच्या खुल्या रंगमंचावर दररोज सायंकाळी वाजता एकांकिका अशा २१ एकांकिका सादर होणार आहेत. यामध्ये कॉमन लाइफ, गिफ्ट, हिरकणी, देता आधार की करू अंधार, आंधळ्या खिडक्या, झाड, शॅडो, अंधार केंद्र, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, साडेसहा रुपयांचे केले काय, भीक म्हणजे, नदी प्यासी थी, तहान, स्टॅच्यू, कावकाव, मोराची जोडी, हार्ट्स बीट्स, फुलवा, उद्याची सकाळ मस्त आहे, दोनच रंग, प्रकाशाच्या दारी या एकांकिकांचा समावेश आहे.