आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धर्मध्वजारोहणाने कचनेर यात्रा महोत्सवाची उत्साहात सुरुवात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - श्री१००८ चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्र कचनेर येथे 4  नोव्हेंबरपासून यात्रेला उत्साहात सुरुवात झाली. क्षेत्राचे अध्यक्ष प्रमोदकुमार कासलीवाल, सुनीलकुमार पाटणी, मनोजकुमार सावजी परिवारातर्फे धर्मध्वजारोहण करून यात्रा महोत्सवाची सुरुवात झाली. सकाळपासूनच कचनेर येथे भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. ठिकठिकाणाहून पायी यात्रेकरूंच्या दिंड्याही क्षेत्रावर दाखल झाल्या आहेत. पायी यात्रेकरूंसाठी सामाजिक मंडळांतर्फे चहा अल्पोपाहाराची व्यवस्था करण्यात आली होती.
याप्रसंगी मुनिश्री प्रबलसागर महाराज, मुनिश्री विप्रणतसागर, आर्यिका गुरुनंदनी माता, आर्यिका कुलभूषणमती माताजी आदी ससंघाच्या उपस्थिती होती. क्षेत्राचे अध्यक्ष प्रमोद कासलीवाल,उपाध्यक्ष प्रवीण लोहाडे, सचिव भरत ठोळे, ललित पाटणी, एम.आर.बडजाते, डॉ.रमेश बडजाते, विनोद लोहाडे, अशोक गंगवाल, वृषभ गंगवाल, के.बी.लोहाडे, प्रकाश गंगवाल, नीलेश काला, केशरीनाथ जैन, रत्नाकर अन्नदाते, किरण मास्ट, केतन ठोळे, डॉ.संतोष गंगवाल, नरेंद्र अजमेरा, हेमंत बाकलीवाल, संतोष पाटणी, दिलीप काला, कैलास काला, सुगंधचंद काला, चंद्रप्रभू महिला मंडळ हडको पाटणी,पीयूष कासलीवाल आदींची प्रमुख उपस्थिती होती.
 
बोलिया होऊन श्री १००८ चिंतामणी भगवंताचा पंचामृत अभिषेक करण्यात आला. अभिषेक करण्याचा मान महाशांतिधारा किशोरकुमार शांतिकुमार गंगवाल शिर्डी यांना मिळाला तर भगवंताचे इंद्र-इंद्राणी बनण्याचे सौभाग्य मनोरमा मदनलाल लोहाडे औरंगाबाद यांना मिळाले. भगवंताचा दुग्धाभिषेक शुभम बुर्र्मे हिंगोली यांनी केला. भगवंताला अर्चनाफळ सुनीता प्रमोदकुमार कासलीवाल परिवार आडूळवाला यांच्या वतीने चढवण्यात आला. यात्रेच्या प्रथम दिवशी सायंकाळी ७.३० ते १० वाजेदरम्यान दीपमाला लोहाडे संचलित दीप सरगम म्युझिक पुणे ग्रृपतर्फे भजन संध्या कार्यक्रम झाला. यात्रा महोत्सवासाठी प्रमोदकुमार जमनलाल कासलीवाल, सुनीलकुमार सुंदरलाल पाटणी, मनोजकुमार दुलीचंदसा सावजी परिवारातर्फे महाप्रसाद वाटप करण्यात आला. प्रवीण लोहाडे यांनी सूत्रसंचालन केले तर बोलिया वाचन सुरेश कासलीवाल, डॉ.संतोष गंगवाल यांनी केले. या वेळी अध्यक्ष डी.यू.जैन, उपाध्यक्ष माणिकचंद गंगवाल, सुरेश कासलीवाल, प्रमोद जैन,महामंत्री भरत ठोले, प्रकाशकाका पाटणी यांची उपस्थिती होती.
 
मुख्य यात्रा महोत्सव उद्या : 4 नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता बोलिया होऊन श्री १००८ चिंतामणी पार्श्वनाथ भगवंताचा पंचामृत अभिषेक संगीतमय वातावरणात होईल. दुपारी वाजता जलयात्रा पालखी रथयात्रा मिरवणूक, सायंकाळी वाजता आरती,शास्त्र वाचन,स्वाध्याय उद्या भाविकांसाठी एसटी महामंडळाच्या वतीने शहागंज,सिडको बसस्टँड येथून दिवसभर बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...