आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लागवड एप्रिल-मेमध्ये, त्याच सदोष बियाण्यांवर बंदी जूनमध्ये; सरकारचा उफराटा न्याय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

करमाड- सदोष बियाणांवर शासनाने जून मध्ये बंदी आणली त्यापुर्वी शेतकऱ्यांनी एप्रिल मेमध्येच कपाशीची लागवड केल्याने गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशीचे नुकसान झाले आहे. यात कृषी विभाग उपाययोजना सांगत असले तरी आता वेळ निघून गेली आहे.  कपाशीची लागवड करताना शेतकरी रेफयुजी बियाण्यांची लागवड (सरळ वाण-नॉन बीटी) करत नाही. त्यामुळे निर्माण होणाऱ्या गुलाबी बोंडअळीला खायला अन्न मिळत नाही. परिणामी बोंडअळीने बीटी वाणातील थोडे थोडे विष खायला सुरुवात केली. यावर्षी बोंडअळीला बीटी कापसातील विष पचू लागले आहे. त्यामुळे उभ्या महाराष्ट्रात बोंडअळीचा हाहाकार झालेला पाहावयास मिळाला. या कारणासाठी जेवढे शेतकरी दोषी आहेत तेवढाच दोष शासन व बियाणे कंपन्यांकडे जातो.   

 

> बीटीभोवती नॉन बीटीचे संरक्षण नसल्याचा कृषी विभागाचा कांगावा 

> एकूण खर्च १ लाख ४५ हजार रुपये

> उत्पादन १२ क्विं. भाव ४२०० = ५०४०० 

- बोंडअळीच्या प्रकोपाने सर्व दहा एकर कपाशी खल्लास झाली.  जेथे सव्वाशे ते दीडशे क्विंटल कपाशी होणार होती आता केवळ १२ क्विंटल कापूस निघाला. आता ट्रॅक्टरने झाडे काढून हरभरा लावायचा आहे.
- नारायण तुपे, शेतकरी बाभुळगाव खुर्द, गारज 

 

विक्रेते, शासन कुणीही जबाबदारी घेईना
या प्रक्रियेतील शेतकरी शासन व बीज विक्रेते हे तीन प्रमुख घटक एक दुसऱ्याकडे बोट दाखवताहेत. देशात बोलगार्ड-२ (बी.टी.)३०० च्या वर वाणाची विक्री होते. यात महाराष्ट्रात कावेरी कंपनीचे एटीएम, जादू, न्युजीवुडु सीडसचे मलिका भक्ती, विक्रमचे ५ व विक्रम ३०३ टाटा टॅलीजचे आतीश व अनमोल, अजित सीडसचे १५५ व १९९, महिको कंपनीचे पॅशन व राशी कंपनीचे ५६९ व ६५१ या वाणाची वेगवेगळया भागात लागवड केली जाते.

 

बातम्या आणखी आहेत...