आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरवस्तीत वृद्ध व्यापाऱ्याचा खून; 29 लाखांची लूट; घरात घुसून तिजोरीतून सोने-चांदी लंपास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लासूर स्टेशन- येथील जुना मोंढा भागातील वृद्ध व्यापाऱ्याचा तीक्ष्ण हत्याराने खून करून सोने-चांदी व रोख अडीच लाख असा एकूण २८ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. ही खळबळजनक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. केशरचंद उत्तमचंद जाजू (बाबूशेठ) (८१, रा. जुना मोंढा) असे खून झालेल्या व्यापाऱ्याचे  नाव आहे.  

दरम्यान, २७ सप्टेंबर रोजी अशाच प्रकारे चोरी करून चोरट्यांनी राजूलबाई माणिकचंदजी पाटणी या ज्येष्ठ महिलेचा खून केला होता. त्याचाही तपास लागला नसतानच मंगळवारी  चोरट्यांनी जाजू यांचा खून करून ऐवज लुटल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. विशेष म्हणजे दोन्ही घटनास्थळांत केवळ शंभर फुटांचे अंतर आहे.  

 या घटनेच्या या निषेधार्थ बाजारपेठ उत्स्फूर्तपणे बंद ठेवून  व्यापाऱ्यांनी पोलिस चौकी गाठून घटनेचा निषेध नोंदवला.   लवकरच तपास करण्याचे आश्वासन ग्रामीण पोलिस अधीक्षक आरतीसिंह यांनी दिल्यावर जमाव शांत झाला.  

 घटनास्थळी अपर पोलिस अधीक्षक  उज्ज्वला वनकर, डीवायएसपी अविनाश सोनवणे यांच्यासह मोठा फौजफाटा दाखल झाला होता.  ठसे तज्ज्ञ श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते.   श्वानपथकाने  गणेश मंदिर व समतानगर दायगाव रस्त्यापर्यंतच माग काढला.
 
गच्चीवरून घरात प्रवेश केल्याचा संशय
अज्ञात चोरट्यांनी गच्चीवरून घरात प्रवेश केल्याशी शक्यता आहे. जाजू यांचा मुलगा कैलास  आपल्या कुटुंबीयांसह वरच्या मजल्यावरील घरात झोपलेले होते. चोरट्यांनी त्यांच्या खोलीची बाहेरून कडी लावली.   समोरील घरात केशरचंद एकटेच झोपलेले होते. त्याच घरातील कोपऱ्यात  ब्रिटिशकालीन चार चाव्यांची तिजोरी आहे.  तिजोरीची चावी घेताना किंवा झोपेतच तीक्ष्ण हत्याराने डोक्यात वार करून जाजू यांचा खून केला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. 
बातम्या आणखी आहेत...