आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्त्यांना नावापुरतीच नावे!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डीबी स्‍टार- वर्षानुवष्रे लक्षात राहतील अशी विकासकामे करण्याऐवजी काही राजकीय मंडळी सार्वजनिक वास्तूंचे नामकरण, नामविस्तार आणि नामांतर करून कायम चर्चेत राहण्याचा आणि वरिष्ठांची र्मजी संपादन करण्याचा प्रयत्न करतात. शहरात अतिक्रमणाच्या विरोधात व्यापक मोहीम राबवणारे तत्कालीन पालिका आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी मनपाने क्रांती चौक ते रेल्वेस्टेशन या सिमेंट रस्त्याला त्यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला होता. पालिकेत तसा ठरावही मंजूर झाला; परंतु आता याच रस्त्याला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असे नाव देण्याचा नवीन ठराव मंजूर करण्यात आला. त्यांनाही नाराज करायला नको म्हणून नवीन रस्त्याला त्यांचे नाव देण्यात आले. रस्त्यांच्या नामकरणाची ही काही पहिली वेळ नाही. जवळपास 200 ते 250 रस्त्यांना यापूर्वीही नावे देण्यात आली आहेत. त्या काळची राजकीय, सामाजिक परिस्थिती आणि जनभावनेचा विचार करून राजकारणी आपला स्वार्थ साधण्यासाठी नामकरणाचा घाट घालतात. पण काळाच्या ओघात ज्यांची नावे दिली गेली त्याचाच विसर पडतो.

नावावरही हातोडा

मनपाच्या सर्वसाधारण सभेत रस्त्यांच्या नामकरणाला मंजुरी मिळाली तर काळ्या पाटीवर सोनेरी अक्षरे असलेले फलक लावले जातात. त्याचे मोठय़ा थाटात अनावरण केले जाते; पण नंतर हे फलक दुर्लक्षित ठरतात. असेच अनेक फलक रस्त्यांचे रुंदीकरण, दुरुस्त्या आणि अतिक्रमणविरोधी मोहिमांमध्ये काढून टाकण्यात आले. त्यानंतर पुन्हा ते बसवण्यासाठी कोणीच पुढाकार घेतला नाही आणि घेतही नाही. या नावांचा सर्वाधिक वापर पत्रव्यवहारासाठी होणे अपेक्षित आहे, पण प्रत्यक्षात खासगी आणि शासकीय पत्रव्यवहारातही या नावांऐवजी त्या भागातील मंदिर, दुकाने, उद्याने किंवा प्रतिष्ठित व्यक्तींच्या घरांचा उल्लेख केला जातो. डीबी स्टारने अशाच काही लोकप्रिय रस्त्यांचा आढावा घेतला.

शास्त्री, भापकर आणि ठाकरे मार्ग

कोकणवाडी ते रेल्वेस्टेशन या रस्त्याला लाल बहादूर शास्त्री मार्ग असे नाव देण्यात आलेले आहे. याचा फलकही कोकणवाडीच्या चौकात आहे. आमदार संजय शिरसाट यांनी हे नाव दिले आहे. विशेष म्हणजे क्रांती चौक ते स्टेशन रस्त्याला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे महामार्ग असे नाव देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. पूर्वी यास भापकर मार्ग देण्यात आले होते. मग या छोट्या भागाला दोन नावे असतील का, असा प्रश्न पडतो.