आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छावणीतील गॅस्ट्रोची साथ नियंत्रणात; रुग्णांचा आकडा पोहोचला 3400 वर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मागील चार दिवसांपासून छावणी परिसरात गॅस्ट्रोचे थैमान सुरू होते. त्याला आज पाचव्या दिवशी विराम मिळाला आहे. सध्या रुग्णालयात अवघ्या १२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत गॅस्ट्रोची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा ३४०० वर गेला आहे.

 

सर्वांना उपचार देण्यात आले असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सहायक निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद धामंदे यांनी दिली.
छावणीत हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. आपत्कालीन स्थिती लक्षात घेऊन सर्व स्तरांतून या भागात मदत पुरवण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने शासकीय वैद्यकीय रुग्णालयाने आणि मिलिटरी रुग्णालयाने दिलेली वैद्यकीय सेवा तसेच विविध संस्था-संघटनांनी दिलेली औषधांची मदत, केलेले सेवाकार्य यांचा मोलाचा वाटा आहे. छावणी परिषदेचे उपाध्यक्ष संजय गोराळ यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. सर्वांची मदत आणि युद्धपातळीवरील प्रयत्न आणि नागरिकांनी स्वत:ची घेतलेली काळजी यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली असल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला आहे.

 

ड्रेनेजचे पाणी पाणीपुरवठ्याच्या पाइपलाइनमध्ये शिरल्याने छावणीत गॅस्ट्रोची साथ झपाट्याने पसरल्याचा आरोग्य विभागाने केलेल्या चौकशीचा प्राथमिक अंदाज आहे. त्यावर उपाययोजना सुरु आहेत.

बातम्या आणखी आहेत...