आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्या’ 130 पैकी 54 बांधकाम परवाने एका मालकालाच वाटले, घाणेगावातील सरपंच आणि ग्रामसेवकाच्या गैरकारभाराचे प्रकरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डीबीस्टार : घाणेगाव येथील विद्यमान महिला सरपंच आणि ग्रामसेवकाने एक तर अधिकार नसताना सिडकोच्या विशेष प्राधिकरण क्षेत्रात तब्बल १३० बांधकाम परवाने वाटले. त्यातही एकाच जमीनमालकाला त्यातील ५४ प्रमाणपत्रे दिल्याचे उघड झाले आहे. या आधारावरच या मालकाने सर्व प्लॉट विकून टाकले. सिडकोची परवानगीच न घेतल्याने भविष्यात ज्यांनी पै-पै जमवून हे प्लॉट घेतले त्यांना असंख्य समस्या येऊ शकतात. 
 
वाळूज परिसरातील घाणेगाव, विटावा, नारायण खुर्द ही ग्रुप ग्रामपंचायत सिडको प्राधिकरण विकास क्षेत्रातील २८ गावांमध्ये येते. नियमानुसार गावठाण हद्दीबाहेर रेखांकन बांधकाम करण्यासाठी सिडकोची परवानगी बंधनकारक आहे. मात्र, घाणेगाव ग्रुप ग्रामपंचायतीने हे सारे नियम धाब्यावर बसवले आहेत.
 
गावठाण हद्दीबाहेर कोणत्याही रेखांकन किंवा बांधकामाला सिडको कार्यालयाची परवानगी लागते. मात्र, ग्रामसेवक बी. बी. गव्हाणे सरपंच दुर्गा उत्तमप्रसाद दुबे यांनी नमुना नंबर ची प्रमाणपत्रे स्वत:च वाटली. गट क्रमांक किंवा सर्व्हे क्रमांक पडल्यानंतर कोणत्याही प्रकारचे गावठाण प्रमाणपत्र देता येत नाही. असे असताना त्यांनी व्यंकटेश गोत्राम यांना १३० पैकी ५४ गावठाण प्रमाणपत्रे दिली आहेत. 
 
ही जमीन दुसऱ्याची आहे. या जमिनीचा जीपीए फक्त माझ्या नावावर आहे. त्यामुळे माझा थेट संबध येत नाही. -व्यंकटेश गोत्राम, जमीनमालक
 
आम्ही अनधिकृतकाम करणाऱ्याना नोटिसा बजावल्या आहेत. त्यांना नोटिसा मिळाल्या नसतील तर पुन्हा पाठवल्या जातील. -गजानन साटोटे, अतिक्रमण अधिकारी, सिडको 
 
घाणेगावाच्या सरपंच आणि ग्रामसेवकाने एकाच मालकाला ते २७ आणि २८ ते ५४ या क्रमांकाचे परवाने वाटली आहेत. अधिकार नसताना त्यावर गावठाण प्रमाणपत्र असे नाव टाकून वाटल्याचे हे आहेत पुरावे.