आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारू दुकाने बंद करण्याच्या प्रस्तावावरून टोलवाटोलवी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दाट वस्तीत आणि लोकांना त्रासदायक ठरणारी दारूची नऊ दुकाने बंद करण्याचा प्रस्ताव अमितेशकुमार यांनी जिल्हधिकाऱ्यांकडे पाठवला. मात्र, असा कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. दोन बड्या अधिकाऱ्यांतील वाद या निमित्ताने समोर आल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात आहे.
दरम्यान, महाराष्ट्र दारुबंदी अधनियम १९४९ चे कलम १४२ (२) नुसार आयुक्तांनी शुक्रवारी रात्री कमलनारायण जैस्वाल (रा. पैठणगेट) यांचा मुकुंदवाडीतील देशी दारूचा प्लाझा वाईन शॉप बार पुढील ३० दिवसांसाठी बंद केला. गेल्या दहा महिन्यंात महिला, नागरिकांनी दारूचे त्रासदायक अड्डे बंद करावे, अशी मागणी करणारे निवेदन पोलिस आयुक्तांना दिले. त्यावर जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही, असे निदर्शनास आणून देताच पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या प्रस्तावाची यादी माध्यमांच्या प्रतिनिधींना दिली.

बंदीसाठी होते मतदान
दरम्यान, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांनी सांिगतले की, दारूचे दुकान बंद करण्यासाठीचा प्रस्ताव उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येतो. मात्र, आमच्याकडे उत्पादन शुल्क, पोलिस आयुक्तालयाकडून प्रस्ताव आला नाही. दुकान बंदीसाठी वॉर्डातील २५ टक्के लोकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रार करावी लागते. त्यानंतर अधिकारी तपासणी करतात. त्यात सत्यता आढळल्यावर प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवतात. मग जिल्हाधिकारी मतदान घेतात. वॉर्डातील ५० टक्क्यांपेक्षा अधिक लोकांनी दुरूबंदीच्या बाजूने मतदाने केल्यावरच कारवाई होते, असेही गावंडे म्हणाले.

प्रस्ताव दिल्याची नोंद...
जिल्हा धिकाऱ्यांना प्रस्ताव का मिळाले नाही, अशी विचारणा केली असता पोलिस आयुक्तालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांिगतले की, प्रत्येक प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या आवक-जावक विभागात देऊन तशी नोंदही रजिस्टरमध्ये केली आहे. त्याच्या नोंदी सोमवारी पाहण्यास मिळतील.

यापूर्वीही विसंवाद
ऑक्टोबरच्या बहुजन क्रांती मोर्चाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांनी आमखास मैदानावर येऊन घ्यावे, असा मोर्चेकऱ्यांचा आग्रह होता. मात्र, तशी परंपरा नसल्याचे डॉ. पांडे यांनी सांिगतल्यावर अमितेशकुमारांनी निवेदन घेऊन दुसऱ्या दिवशी पांडेना पाठवले होते. दुसरीकडे पांडे दालनातच शिष्टमंडळाची वाट पाहत बसल्या होत्या.

{मुकुंदवाडी : दोन देशी दारूची दुकाने (प्रस्ताव विचाराधीन)
{विश्रांतीनगर : रेल्वेस्टेशनजवळील देशी दारूचे दुकान
{शहागंजातील : देशी दारू दुकान
{टिळकनगरातील : पेशवा बिअर बार
{मयूरपार्क : नंदादीप हाउसिंग सोसायटीतील देशी दारूचे दुकान
{मुकुंदवाडी : क्रिस्टल वाइन शॉप
{करोडी शिवार : हॉटेल साई राजमाता वाइन शॉप
{पानदरिबा : हॉटेल पंजाब
{हर्सूल : श्रेयस बियर शॉपी, साई वाइन शॉप
ही आहेत दारूची त्रासदायक दुकाने
जिल्हाधिकारी : आमच्याकडे दुकाने बंद करण्याचा प्रस्ताव आला नाही
पोलिस आयुक्त : जिल्हाधिकाऱ्यांकडे दुकाने बंद करण्याचे प्रस्ताव पाठवले
बातम्या आणखी आहेत...