आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धास्ती कायम, 60 वाहने जाळल्याची माथेफिरूची कबुली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज- चार वर्षांपासून दोनशेंवर दुचाकी पन्नासवर चारचाकी आणि १५ सायकली जाळणाऱ्या शिवाजी किसन रहाटवाड (२५ रा.लायननगर) या माथेफिरूला अटक केल्याचा दावा सोमवारी पोलिसांनी केला होता. मात्र त्याने ६० वाहने जाळल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे वाहने पेटवणारे एकापेक्षा अधिक असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आजवरअडीचशेवर वाहने खाक :गेल्या चार वर्षांपासून बजाजनगर कामगार वसाहतीत दुचाकी,चारचाकी सायकली जाळण्याचे प्रकार वारंवार सुरू आहेत. आतापर्यंत २०० दुचाकी, ४० चारचाकी वाहनांची राखरांगोळी झाली आहे. या प्रकारामुळे कामगारांत दहशत पसरली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे लावूनही उपयोग होत नसल्याने पोलिसही हतबल झाले.

जंग-जंग पछाडूनही वाहने जाळणारा माथेफिरू पकडण्यात पोलिसांना यश आले नव्हते. मध्यंतरीच्या काळात पोलिस आयुक्तालयातील पोलिस पथक गस्तीवर बोलावण्यात आले. गुन्हे शाखाही माथेफिरूच्या शोधासाठी कामाला लागली. अशातच गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक सुभाष खंडागळे यांनी एका माथेफिरूवर गोळ्या झाडल्या. मात्र, माथेफिरू बचावला.
आरोपी मनोरुग्ण
खबऱ्यानेदिलेल्या माहितीवरून शिवाजी रहाटवाडकर हा वाहने जाळत असल्याचे पोलिसांना कळाले. पोलिसांनी त्याच्या लायननगर, वाळूज भागातील घरावर चार दिवसांपासून पाळत ठेवली होती. सोमवारी दुपारी तो अलगद सापळ्यात अडकला. त्याने ६० वाहने जाळल्याची कबुली दिल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे. मात्र, हा तरुण मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांच्या दाव्यामध्ये किती सत्यता आहे, हे वेळच सांगणार आहे.
वाहनांची राखरांगोळी

४० चारचाकी
२०० दुचाकी
बातम्या आणखी आहेत...