आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अतिरेक्यांना मदत करणाऱ्या ‘खिलजीं’चा शहरात वावर?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - अतिरेकी कारवायांना खतपाणी घालणाऱ्या अखिल खिलजी याच्यासारखे अनेक खिलजी शहरात बिनधास्त वावरत आहेत. २५ पेक्षा अधिक जण साड्या, सतरंज्या विक्रीच्या नावाखाली शहराची रेकी करत असल्याचा पोलिसांचा कयास आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिस अशा खिलजींवर करडी नजर ठेवून आहेत.
२०१२ मध्ये हिमायतबाग एन्काउंटरनंतर यात सहभागी अधिकाऱ्यांच्या जीविताला धोका असल्याची गुप्तचर संस्थांची माहिती आहे. त्यामुळे त्यांच्यावर स्लीपर सेलच्या माध्यमातून हल्ला केला जाऊ शकतो. त्यामुळे एन्काउंटरमधील अधिकाऱ्यांना विशेष सुरक्षा देण्याचे निर्देश गृह विभागाकडून देण्यात आले होते. तत्कालीन एटीएसचे अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्यांच्या शासकीय बंगल्याची सरंक्षण भिंत पाच फुटांवरून तीन फूट वाढवून फूट करण्यात आली आहे.

साड्या किंवा सतरंज्या विक्रीच्या नावाखाली अनेक जण मध्य प्रदेशातील खंडवा किंवा आसपासच्या परिसरातून शहरात येतात. अखिल खिलजीही एन्काउंटरपूर्वी अनेकदा औरंगाबादसह जळगाव, बुलडाणा आणि खामगाव येथे साड्या विक्रीच्या निमित्ताने गेला होता हे पोलिस तपासात स्पष्ट झाले. त्याच धर्तीवर मध्य प्रदेशातून २० ते २५ जण साड्या, सतरंज्या तसेच अन्य साहित्य विक्रीसाठी शहरात आले आहे. यातील अनेक जण वेळोवेळी शहरातून बाहेर पडतात अन् काही दिवसांनी पुन्हा प्रगट होतात. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर लक्ष केंद्रित केले आहे. अखिल खिलजी याने साड्यांचे व्यापारी असल्याची बतावणी करूनच नंदुरबार शहरात बस्तान मांडले होते.

पोलिस दलाचे आधुनिकीकरण झाले असले तरी काही जुन्या पद्धती तपासासाठी पूरक होत्या. गावखेड्यात पोलिस पाटील बाहेरच्या लोकांची माहिती ठेवून त्यांची माहिती पोलिसांना पुरवत होते. ही पद्धत आता बाद झाली अाहे. आता मात्र केवळ विदेशातील व्यक्तीची माहितीच शहर विभागात ठेवली जाते.

खिलजी बनला विक्रेता
औरंगाबाद स्लीपर सेल
गेल्या वीस वर्षांत आैरंगाबाद शहराचा वापर अतिरेक्यांनी दळणवळणासाठी केल्याचे तपासात पुढे आले आहे. अतिरेकी आणि मुंबईतील गँगस्टर्स टोळ्यांनी आैरंगाबाद किंवा खुलताबादसारख्या स्थळाचा शस्त्र वाहतुकीसाठी वापर केल्याचे पोलिस तपासात समोर आले होते.

गुन्हेगारही टेक्नोसॅव्ही
मोबाइलआणि सीसीटीव्ही क्षेत्रात मोठी क्रांती झाली असली तरी गुन्हेगार किंवा अतिरेकी कारवाया करणाऱ्यांनीही त्यावर तोडगा काढला आहे. अतिरेकी मोबाइल जवळ ठेवत नाहीत. सीसीटीव्ही आहे का याची खात्री करूनच ते कारवाया करत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. यामुळे गुप्तचर यंत्रणेलाही काही मागोवा मिळत नाही.

हिमायतबाग प्रकरणातील पाचही आरोपींनी आम्ही माल-ए-गनिमतसाठी काम करत असल्याची कबुली दिली होती. तत्कालीन एटीएसप्रमुखांनी शहरातील १५ ते ३० जणांना बोलावून संवाद साधला. तेव्हा त्यांनी माल-ए-गनिमतसाठी काम करत असल्याचे सांगितले होते.
{माल-ए-गनिमतम्हणजे काय? मोठीदुकाने, संस्था किंवा बँक लुटायच्या आणि तो पैसा अतिरेकी कारवायांसाठी वापरायचा, असा या शब्दाचा अर्थ आहे.

^अखिल खिलजीहा साड्याचा व्यापारी असल्याचे सांगून अनेक शहरांत राहिला. खोल्या भाड्याने घेतल्या आणि त्यानंतर रेकी करणे, सहकाऱ्यांना आश्रय देणे त्याने सुरू ठेवल्याचे तपासात पुढे आले. -नवीनचंद्र रेड्डी, पोलिसअधीक्षक
बातम्या आणखी आहेत...