आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोपांच्या पिशव्यांत चाळणी न करताच भरली जाते माती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागद  - रोजगार हमी योजनेअंतर्गत येथील वन विभागाच्या रोप वाटिकेमध्ये रोपांच्या पिशव्या भरण्याचे काम नियमांना डावलून करण्यात येत असल्याची बाब समोर आली आहे. सध्या रोहयो मजुरांकडून रोपांच्या पिशव्यांत माती भरण्याचे काम चालू आहे.
 
परंतु या ठिकाणी  वन विभागाचे सपशेल दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. मजुरांची हजेरी सकाळी मजूर आल्यावर लगेचच मस्टरवर घ्यावी लागते. परंतु २ ते ३ वाजेपर्यंत हजेरी घेतले जात नाही.  पिशव्यांमध्ये रोपे भरताना कोणती काळजी घ्यायला हवी.
 
 याबाबतचे येथे फलकही आहे. परंतु  काम मात्र उलट होताना दिसून येते. ५ घन मीटरचे मिश्रणासाठी ४ एमएमची  माती व वाळू गाळण्यासाठी, शेणखत गाळण्यासाठी १० बायची चाळणी आवश्यक आहे.
 
 मात्रा मोजण्यासाठी  लाकडी खोके वापरणे बंधनकारक अाहे. परंतु, ट्रॅक्टरमधून आणलेली जशीच्या तशी माती रोपांच्या पिशवीत भरून कामात हलगर्जीपणा करण्यात येत आहे. त्यामध्ये दगड, मातीचे ढेकळं दिसून येतात. 
 
 ५ घन मीटरसाठी ११ औषधींचे मिश्रण करावे लागते तेही करण्यात येत नाही. पिशव्या भरताना पिशवीचे वरील भाग आतील बाजूस दुमडावे लागते. तेही होत नाही. चौकीदाराची मनमानी होत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.
 
चौकशी करून कारवाई करू  
- या प्रकाराबाबतची चौकशी करण्यात येईल. त्यात काही त्रुटी आढळल्यास  चौकीदार गणेश पवारांवर कारवाई करण्यात येईल. -  पी. पी. वरुडे, सहायक वनरक्षक, औरंगाबाद.
बातम्या आणखी आहेत...