आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मीटरमध्ये गरम सुई घालून संथ केली रीडिंगची गती, गुन्हे शाखेच्या चौकशीत धक्कादायक बाबी उघड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- महावितरणच्या वीजचोरी प्रकरणात अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. मीटरमध्ये गरम सुई घालून मीटर रीडिंगचा वेग संथ करण्याची शक्कलही काही वीजचोरांनी लढवल्याचे महावितरण गुन्हे शाखेच्या चौकशीत समोर आले आहे. प्रारंभी ही वीजचोरी केवळ चिनी इलेक्ट्रॉनिक किटचा वापर करूनच केली जात होती, असा समज होता.

१५ जुलै रोजी महावितरण पोलिसांनी घरगुती मीटरची रीडिंग थांबवून वीजचोरी करण्यासाठीचे सर्किट बनवणारी टोळी उघडकीस आणली होती. हर्सूल येथील इलेक्ट्रिशियन किशोर रमेश राईकवार हा यातील मुख्य सूत्रधार अाहे. डिजिटल मीटरसाठी किशोर चायना मेड सर्किट वापरत होता.

हे सर्किट बसवले की रिमोटद्वारे रीडिंग बंद सुरू करता येत होती. हाच किशाेर अनेक ग्राहकांना या सर्किटशिवाय वीज बिल कमी येण्यासाठी सुईचा वापर करून मीटरमध्ये छेडछाड करून देत होता. चौकशीत हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी शहानिशा केली असता काही मीटरमध्ये असा प्रकार केल्याचे स्पष्ट झाले आहे. मीटरच्या एका ठरावीक ठिकाणी सुई गरम करून आत टाकली जात होती. हे केल्याने मीटरच्या आतील सर्किटमध्ये बदल होऊन मीटर रीडिंग संथगतीने फिरते. वीज बिल कमी येत होते. सुई घातल्याने ५० ते ७० टक्क्यांपर्यंत मीटर हळू फिरत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
 
20 कर्मचारी, 4 अधिकारी : घोटाळा समोर आल्यानंतर याप्रकरणी गुन्हे शाखेकडे तपास देण्यात आला. वीज बिल कमी आलेल्या सर्व ग्राहकांना पोलिस आयुक्तालयात बोलावण्याचा निर्णय घेतला होता. परंतु यात अडचणी येत असल्याने पोलिसांनी आता स्वत:च महावितरणने दिलेल्या ग्राहकांच्या घरी जाऊन तपासणी आणि चौकशी करण्याचे ठरवले. यासाठी महावितरणकडून संशय असलेल्या निश्चित ग्राहकांची यादी मागवली आहे. त्यांची तपासणी चौकशी करण्यासाठी महावितरण, पोलिसांचे जवळपास २० ते ३० कर्मचारी आणि चार अधिकाऱ्यांची चार पथके तयार केली आहेत. या पथकाने शुक्रवारी हर्सूल, जिन्सी आणि छावणी परिसरात तपासणी केली. हर्सूल परिसरात आरोपीने वीस ग्राहकांना हे सर्किट वापरल्याचे सांगितले. चौकशीत हा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
 
कृषी अधिकारी अटक
शुक्रवारीरात्री उशिरा गुन्हे शाखेने याकूब सय्यद हनिफ शेख (रा. हर्सूल) याला अटक केली. याकूब हा सोयगाव तालुक्यातील मंडळ कृषी अधिकारी अाहे. त्याने मीटरमध्ये फेरफार केला होता.
बातम्या आणखी आहेत...