आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांनी समयसूचकता दाखवली असती तर....

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे कर सहायकपदाची परीक्षा रविवारी राज्यभरात झाली. परीक्षेपूर्वीच एक दिवस अगोदर विद्यार्थ्यांनी पेपर फोडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी समयसूचकता दाखवली असती तर विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय झाले नसते, अशी प्रतिक्रिया अटक झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी दिली.
रविवारी पहाटे वा. पोलिसांच्या हाती फुटलेला पेपर होता. परीक्षा स. ११ वा. होती. कारवाई परीक्षेच्या वेळेत नऊ तासांचा फरक होता. या वेळेत जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करून पोलिस मूळ प्रश्नपत्रिकेशी फुटलेली प्रश्नपत्रिका पडताळून पाहू शकत होते. मात्र, तसे झाल्याने विद्यार्थ्यांना पेपर देता आला नाही. यातील बहुतांश विद्यार्थी ग्रामीण भागातील आहेत. अटक केलल्या अर्जुन बमनावत कृष्णा मारक या दोन विद्यार्थ्यांना १० जूनपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. पोलिस निरीक्षक गौतम पातारे तपास करीत आहेत. ही कारवाई पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, मधुकर सावंत, गजानन कल्याणकर, उन्मेश थिटे, विश्वास पाटील, अनिल वाघ, नितीन देशमुख, सुदर्शन एखंडे गुन्हेशाखेच्या कर्मचाऱ्यांनी केली.
या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रतापसिंह महाजन काकरवाल याने २०१४ मध्ये झालेली लोकसभेची निवडणूक जालना मतदारसंघातून अपक्ष म्हणून लढवली होती. त्याला हजार २३७ मते पडली होती. त्याला राजकीय पार्श्वभूमी नाही.