आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्धारित वेळेच्या तीन तास उशिराने टापरगाव पूल जड वाहतुकीसाठी खुला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रवाशांना दुपारी साडेतीनपर्यंत उन्हात पूल पार करावा लागला.  छाया : वैभव किरगत - Divya Marathi
प्रवाशांना दुपारी साडेतीनपर्यंत उन्हात पूल पार करावा लागला. छाया : वैभव किरगत
हतनूर- सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग क्र. २११ (५६) टापरगावजवळील शिवना नदीवरील पुलास तडे गेल्याने ५ महिन्यांपासून डागडुजीसाठी अवजड वाहतुकीस बंद असलेला पूल  बुधवारी दुपारी ३.४५ वा. खासदार चंद्रकांत खैरे  यांच्या हस्ते श्रीफळ फोडून अवजड वाहतुकीस खुला करण्यात आला.  नियोजित वेळेच्या तीन तास उशिराने पूल खुला केल्याने येथे एसटी बसमधील प्रवाशांची मोठी दैना झाली. साडेबारापासून अवजड वाहतूक दोन्ही बाजूंनी उद््घाटनाच्या प्रतीक्षेत होती. अखेर पावणेचार वाजता पूल खुला केल्यावर जड वाहनांचा मार्ग मोकळा झाला. पुलाच्या एका स्पॅनचे काम झाले असून ते दोन वर्षांपर्यंत टिकेल, अशी माहिती तांत्रिक व्यवस्थापक पाटील यांनी दिली.   

पुलाला तडे गेल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने ५ ऑक्टोबर ते ४ डिसेंबर २०१६ पर्यंत जड वाहतुकीस पूल बंद ठेवून पुलाची डागडुजी करून वाहतुकीस खुला करण्यात येणार होता. परंतु वाहतूक वळवण्यासाठी प्रशासनाचे नियोजन नसल्याने २१ ऑक्टोबर रोजी बसवलेली कमान त्याच दिवशी रात्री पुलावरून वाहतूक बंद असल्याचा फलक न लावल्याने अज्ञात वाहनाच्या धडकेने अवघ्या ३ तासांतच तुटली. त्यानंतर दुसरी कमान १० डिसेंबर रोजी तुटली असल्याने वाहतूक वळवण्यातच पूल बंदचा कालावधी निघून गेला. परंतू जड वाहतूक पाच महिने पुलावरून बंद होती. 

डागडुजीसाठी होती जड वाहतूक बंद
या पुलाला चार स्पॅन असून एक स्पॅन हा धोकादायक स्थितीत असल्याने या पुलाचे डागडुजीचे काम करणे अत्यंत महत्त्वाचे होते. त्या अनुषंगाने एका स्पॅनची डागडुजी सॅमफील्ड कंपनीने केली आहे. उर्वरित ३ स्पॅन हे सद्य:स्थितीत त्याची तपासणी करून आवश्यकता भासल्यास त्याचेही काम केले जाईल. झालेल्या कामानंतर वाहतुकीस काही अडचण नसून वाहनांना पुलावरून जाताना वेगावर नियंत्रण ठेवून वेग हा २० स्पीडपेक्षा जास्त नसावा. पुलाच्या दोन्ही बाजूंनी गतिरोधक उभारण्यात येणार असल्याची माहिती तांत्रिक व्यवस्थापक महेश पाटील यांनी दिली.  
बातम्या आणखी आहेत...