औरंगाबाद- धर्म व समाजाच्या संरक्षणासाठी शिखांचे दहावे गुरु, गुरु गोविंद सिंहजी यांनी 1699 मध्ये खालसा पंथाची स्थापना केली. खालसा पंथाच्या माध्यमातून त्यांनी जातीय भेद नष्ट करून समानता प्रस्थापित केली. शीख बांधवामध्ये आत्म-सन्मानाची भावना वाढीस लावला, हा त्यांचा प्रामाणिक उद्देश होता.
गुरु लहानपणापासून धनुर्विद्येंत निष्णात होते. तेव्हा पंजाबात मोघलांची सत्ता स्थापन झाली होती. बाबा अजित सिंह, बाबा जुझार सिंह ही त्यांची मुले चमकौरच्या युद्धात शौर्यमरण प्राप्त झाले होते. तर बाबा जोरावर सिंह व फतेह सिंह या लहान मुलांना सरहंदच्या नवाबने जिवंत भिंतींत पुरले होते. तर, गुरूजींनी आजच्या दिवशी म्हणजे 7 ऑक्टोबर 1708 मध्ये नांदेड येथे अखेरचा श्वास घेतला.
गुरूजींनी केसगड, फतेहगड, होलगड, आनंदगड व लोहगड हे किल्ले युद्धात जिंकले होते. त्यांनी 42 वर्षापर्यंत शत्रूविरुद्ध सामना केला होता. गुरूजींचा संपूर्ण परिवारच धर्मासाठी लढत होता. 1708 मध्ये त्यांनी नांदेड येथील सचखंडमध्ये त्यांनी देह त्यागला होता.
पाच 'क'कारांची निर्मितीगुरूजींनी 1699 मध्ये खालसा पंथाची स्थापना केली. या पंथाचे स्वरूप लढाऊ होते. त्यावेळी समाजबांधवांना शिस्तीच्या एका धाग्यात बांधण्यासाठी त्यांनी पाच ककारांची निर्मिती त्यांनी केली. जो ककार मानेल त्याला खालसा पंथाचे मानले जात असे. त्यांनी केलेली खालसा पंथाची स्थापना ही महत्त्वपूर्ण घटना मानली जाते.
पुढील स्लाइड्सवर वाचा, नांदेडला का मानतात पवीत्र, गुरूजींबाबत काही रंजक बाबी...