आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणाचे लैंगिक शोषण : तिघेही रात्रभर राहायचे प्राध्यापक निवासस्थानामध्ये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- भारतीयसेवा सदन या शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष निरंजनकुमार गोयनका सचिव जुगलकिशोर रुंगटा हे रात्रभर प्राध्यापक निवासस्थानामध्ये थांबायचे आणि सकाळी निघून जायचे, असे संस्थेतील काही कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दिलेल्या बयाणात सांगितल्याची माहिती आहे.

पोलिसांनी सलग तिसऱ्या दिवशी घटनास्थळाच्या आजूबाजूला राहणाऱ्यांची चौकशी केली. त्यात ही धक्कादायक माहिती समोर अाली आहे. संस्थेतीलच चार ते पाच कर्मचाऱ्यांच्या बयाणावरून येथे अनैतिक कृत्य चालत असावे, याला दुजोरा मिळत असल्याचे दिसून येत आहे.
रात्री वाजताच्या सुमारास निरंजनकुमार गोयनका आणि जुगलकिशोर रुंगटा एक युवक प्राध्यापक निवासस्थानामध्ये यायचा. ते रात्रभर थांबायचे आणि सकाळी निघून जायचे. ते तेथे काय करायचे हे आम्हाला माहीत नाही. संस्थेचे प्रमुख असल्यामुळे आम्ही त्या भानगडीतही कधी पडलो नाही, असे

बयाणसंस्थेतीलच काही कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दिले आहे. पोलिसांनी या बयाणाची नोंद केली असून, या प्रकरणातील साक्षीदार म्हणून त्यांचा फायदा तपासाच्या दृष्टिकोनातून पोलिसांना होऊ शकतो, तर अनेकांनी संस्थेत नोकरी करायची असल्यामुळे संस्थेच्या दबावापोटी पोलिसांपासून लांब राहणे पसंत केले. दोन्ही आरोपी फरार असून, या प्रकरणी पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही.
पुरावा नष्ट करणारा होतो सहआरोपी

प्राध्यापक निवासस्थानामध्ये युवकावर अनैसर्गिक बलात्कार होत असल्याचे चित्रफितीमध्ये दिसून येत होते. मात्र, ते हे निवासस्थान नव्हेच म्हणून त्या निवासस्थानाची नुकतीच रंगरंगोटी करण्यात आलेली दिसून आली. त्यामुळे ज्यांच्या अखत्यारीत हे निवासस्थान आहे आणि ज्यांनी पुरावा नष्ट केला त्यांना या प्रकरणात सहआरोपी करणे आवश्यक असताना पोलिसांनी मात्र अद्यापही तसे केलेले नाही.
महाविद्यालयात सन्नाटा
संस्थेच्या माजी अध्यक्ष आणि सचिव यांच्यावर युवकाच्या लैंगिक शोषणाचे आरोप झाल्यानंतर शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. आपण ज्या महाविद्यालयात शिकतो, तेथील पदाधिकाऱ्यांविरुद्ध विद्यार्थ्यांना घृणा वाटत असल्यामुळे महाविद्यालय गुरुवारी शांत होते. तसेच विद्यार्थिनींनीसुद्धा महाविद्यालयाकडे पाठ फिरवल्याने महाविद्यालयात सन्नाटा पसरला आहे.

फिर्यादी अन् साक्षीदारांना धमक्या, संरक्षण मात्र नाही : पीडितयुवकाला बुधवारी रात्री प्रकरण मागे घेण्यासाठी धमकी देण्यात आली. तसेच एका आमदाराच्या स्वीय सहायकाने तडजोड करण्यासाठी युवकावर दबाव आणला होता. युवकाला न्याय मिळावा म्हणून प्रयत्न करणारे माजी मुख्याध्यापक गणपतराव आंबिलवादे यांना पोलिसांनी संरक्षण देणे आवश्यक हाेते, मात्र तसे झाले नाही.

पोलिस म्हणतात, तुम्हीच सांगा कुणाचे घ्यायचे बयाण :
पोलिसम्हणाले की, आम्ही तपास करण्यासाठी गेलो. मात्र, तेथे कुणीही बोलायला तयार नव्हते. त्यामुळे कुणाचे बयाण घ्यायचे ते सांगा, असे तक्रारदार आणि साक्षीदारांना म्हटले. तर, या आणखी काही जणांवर अशा प्रकारचा प्रसंग बेतला असेल, तर त्यांनी समोर यावे, असे आवाहनही केले.

प्राध्यापक निवासस्थानाच्या चाव्या निघाल्या गोयनकाकडे
ज्या निवासस्थाना मध्ये युवकावर अनैसर्गिक अत्याचार होत होता, त्याच्या चाव्या नियमानुसार प्राचार्यांकडे पाहिजे होत्या. मात्र, प्राचार्यांनी चाव्या आपल्याकडे नसून, गोयनकाकडे असल्याचे सांगितले. जेव्हा निवासस्थान उघडले तेव्हा नुकताच रंग दिलेला दिसून आला. त्यामुळे निवासस्थान ते वापरत असल्याचे लक्षात अाले.