आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : पत्नीपीडित पुरुषांसाठी स्थापला आश्रम, येथे दररोज करतात कावळ्याची पूजा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आश्रमाचे संस्थापक भारत फुलारे - Divya Marathi
आश्रमाचे संस्थापक भारत फुलारे
औरंगाबाद - आनंदा पवार (वय ५४ वर्षे) एका नामांकित महाविद्यालयात प्राध्यापक. पत्नीच्या त्रासाला कंटाळून त्यांना २००३ मध्ये सहा वर्षांचा संसार नाइलाजाने मोडावा लागला. प्रमोद ऊर्फ बापू तरवटे (वय ५३) यांचीही अशीच व्यथा. पत्नीच्या त्रासाला वैतागलेले केवळ हे दोघेच नाहीत तर अशांची यादी वाढतेच आहे. विशेष म्हणजे हे सर्व पत्नीपीडित पुरुष आश्रमात एकत्र आले आहेत. पत्नीकडून १४७ खटले दाखल असलेले संस्थापक भारत फुलारे इतरांसह कायदेशीर लढाईची व्यूहरचना आखत आहेत.
   
औरंगाबादपासून १२ किलोमीटर अंतरावर शिर्डी-मुंबई महामार्गावर करोडी-साजापूरकडे जाताना रस्त्याच्या कडेला हा आगळावेगळा आश्रम उभा आहे. आश्रमात प्रवेश करताच वेगळा अनुभव मिळतो. पहिल्याच खोलीत कार्यालय थाटले असून पत्नीपीडितांना येथे कायदेशीर सल्ला दिला जातो. कार्यालयातील थर्माकोलपासून बनवलेला कावळा सर्वांचे लक्ष वेधतो.  
 
दर शनिवार, रविवार सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत येथे समुपदेशन केले जाते. छत्तीसगड, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेशातूनही पत्नीपीडित पती आश्रमात सल्ला घेण्यासाठी येत आहेत. एखाद्या निष्णात वकिलाकडे ज्याप्रमाणे खटल्याचे डिटेल्स आणि साक्षी, पुरावे असतात त्याप्रमाणे आश्रमाचे संस्थापक, संचालक भारत फुलारे यांनी प्रत्येकाच्या फाइल्स तयार करून ठेवल्या आहेत.     
 
खटल्यातील कमकुवत बाजू शोधून त्यावर मात करण्यासाठी प्रसंगी कायदेशीर तज्ज्ञांचा सल्लाही घेतला जाते. विशेष म्हणजे वकीलही पत्नीपीडित शोधला जातो. फुलारे यांच्या मालकीच्या १२०० चौरस फुटांच्या प्लॉटवर बांधकाम केलेल्या या आश्रमात  खिचडी, भाकरी, भाजी, वरण असा स्वयंपाक हे पतिराजच बनवतात. आश्रमात राहणारे सदस्य वर्गणी जमवून रोजचा खर्च भागवतात. गरज असल्यास एखाद्या व्यक्तीस रोजगारही उपलब्ध करून दिला जातो. आजवर ५०० जणांनी आश्रमात येऊन सल्ला घेतला आहे.
 
पुढील स्लाईडवर वाचा, असे राहतात पत्नी पीडित... आणि पाहा VIDEO...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...