आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ट्रकवर जीप आदळून 1 ठार, 6 जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज- नगर येथील विवाह सोहळा आटोपून परतणाऱ्या वऱ्हाडींची बोलेरो गाडी उभ्या ट्रकवर आदळली. या अपघातात एक जण ठार, तर सहा जण जखमी झाले. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात नगर-औरंगाबाद महामार्गावर वाळूजलगत इसारवाडी फाट्यावर गुरुवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास घडला. अंजन रामभाऊ अजितवार (३०, रा. बजाजनगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. जखमींत जीप चालकाचाही समावेश आहे. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बजाजनगर येथील सात जण गुरुवारी सकाळी बोलेरो जीपने (एमएच २० सीएस ४४०९) नगर येथे विवाह सोहळ्याला गेले होते. यात अंजन अजितवार, विष्णू भावराव सुलताने (३०), रामराव वसंत भोसले (३०), मंगल बापू काळे (३०), लिंबाराव किसन गर्जे (३०), लीलाधर एकनाथ बडगुजर (३०) चालक संतोष धाकवाडे (३० रा.सर्व बजाजनगर) यांचा समावेश होता. विवाह सोहळा आटोपून ते सायंकाळच्या सुमारास घरी परत येत होते. त्यांची बोलेरो जीप नगर-औरंगाबाद मार्गावर इसारवाडी फाट्याजवळ महामार्गाच्या मधोमध नादुरूस्त स्थितीत उभ्या ट्रकवर आदळली.
जीपचा वेग जास्त असल्याने ती अपघातानंतर ट्रकमध्ये अडकून पडली. त्यामुळे जखमींना काढण्यासाठी दुसरा ट्रक बोलावून अपघातग्रस्त जीप ओढून वेगळी करावी लागली. त्यानंतर सर्व जखमींना जीपमधून बाहेर काढता आले. गंगापूर पंचायत समितीचे सदस्य कृष्णा पाटील सुकासे, विलास धामणे इतरांनी रुग्णवाहिका बोलावून जखमींना घाटी रुग्णालयात हलवले. मात्र,अंजन अजितवार यांना घाटीतील वैद्यकीय अधिकाऱ्याने तपासून मृत घोषित केले.
जखमीपैकी जीप चालक संतोष धाकवाडे याची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
प्राथमिक उपचारानंतर सर्व जखमींना शहरातील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. वाळूज पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे. पोलिस जमादार ए.एस.ढोले पुढील तपास करीत आहेत.
बातम्या आणखी आहेत...