आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘त्या’ पीडित मुलीचा वाढदिवस पुन्हा साजरा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जिन्सी परिसरातील ‘त्या’ पीडित मुलीचा दरवर्षी धुमधडाक्यात साजरा होणारा वाढदिवस यंदा घरीच साजरा झाल्याने “मम्मी बर्थ डे में मेरी सहेलिया और मेहमान क्यूं नही आए’ असा प्रश्न त्या मुलीने उपस्थित केला होता. याचे वृत्त शनिवारी ‘दिव्य मराठी’ने प्रकाशित करताच रविवारी केअर इनिशिएटिव्ह या संस्थेने पीडित मुलीच्या घरी जाऊन तिचा वाढदिवस साजरा केला. पीडित मुलीने केक कापला. या वेळी मुलीचे कुटुंबीय संस्थेेचे सदस्य उपस्थित होते.
जिन्सीतील आठ वर्षीय पीडित मुलीचा शुक्रवारी वा वाढदिवस होता. दरवर्षी वाढदिवस धुमधडाक्यात साजरा होत होता. तिच्यावर अत्याचार झाल्याने कुटुंबीयांनी घरातच साध्या पद्धतीने तिचा वाढदिवस साजरा केला होता. तसे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर केअर इनिशिएटिव्ह या संस्थेने रविवारी संध्याकाळी मुलीच्या घरी जाऊन तिचा वाढदिवस साजरा केला. या वेळी संजीवनी पाटील ही नऊ वर्षीय मुलगी वाढदिवसाच्या कार्यक्रमात पीडितेला शुभेच्छा देण्यासाठी आली होती. तसेच संस्थेचे अनिरुद्ध खडीकर, अभिजित धामणगावकर, रूपेश पाटील, अभिजित वैद्य, गणेश डांगे उपस्थित होते.

संस्था पीडितेच्या सोबत
केअरइनिशिएटिव्ह ही संस्था पीडितेच्या कुटुंबीयांसोबत अाहे. या कुटुंबीयांना गरज पडेल तेव्हा संस्थेचे सदस्य मदतीसाठी पुढे येतील, असे खडीकर यांनी सांगितले. आमच्यावर जे संकट आले ते कधीच भरून निणार नाही. समाजाने आम्हाला साथ दिली पाहिजे, अशी भावना या वेळी पीडितेच्या कुटुंबीयांनी बोलून दाखवली.

बातम्या आणखी आहेत...