Home »Maharashtra »Marathwada »Aurangabad» The Villagers And Farmers Block The Road

ग्रामस्थ-शेतकऱ्यांचा रास्ता रोको, महावितरण कार्यालयाच्या निषेधार्थ शेतकरी आक्रमक

प्रतिनिधी | Mar 20, 2017, 08:41 AM IST

  • ग्रामस्थ-शेतकऱ्यांचा रास्ता रोको, महावितरण कार्यालयाच्या निषेधार्थ शेतकरी आक्रमक
वैजापूर-विद्युत महावितरण कंपनी कार्यालय विभाग क्र. दोन यांनी वीज बिल वसुलीसाठी गावाची वीज जोडणी खंडित करण्याच्या भूमिकेवर कोल्ही गावातील संतप्त ग्रामस्थ, शेतकरी, महिलांनी रविवारी सकाळी खंडाळा-शिऊर रस्त्यावर तासभर रास्ता रोको आंदोलन करून विद्युत पुरवठा पूर्ववत करण्याच्या मागणीच्या निवेदन प्रशासनाला देण्यात आले.

महावितरण कंपनीच्या वतीने मार्चअखेर ग्राहकांकडील थकीत चालू वीज बिल वसुलीसाठी ग्रामीण भागात विशेष वसुली मोहीम हाती घेतली आहे. कोल्ही, शिऊर, सफियाबादवाडी, सुदामवाडी, अलापूरवाडी या गावांतील शेतीपंपांचा वीजपुरवठा तडकाफडकी तोडून टाकल्याने हातातोंडाशी आलेले पीक हातून जाण्याची भीती निर्माण झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागत आहे.

सरकारचे कोणत्याही प्रकारचे आदेश नसताना महावितरण कंपनीने वैजापूर तालुक्यातील केवळ पाचच गावांना जाणीवपूर्वक निवडून वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे महावितरणने यासंदर्भात कोणतीच पूर्वकल्पना अथवा नोटीस शेतकऱ्यांना दिलेली नाही. नोटाबंदी, शेतमालाचे पडलेले भाव, पिकाची कमतरता यामुळे शेतकरी अडचणीत असताना त्याला आणखी संकटात टाकण्याचे काम महावितरणचे अधिकारी करत आहेत. नियमानुसार जे वीज बिल भरणार नाहीत त्यांचा वीजपुरवठा बंद करण्याचा नियम असताना महावितरणने सर्रास रोहित्रावरून सर्वांचाच वीजपुरवठा खंडित केला त्यामुळे शेतकरी रस्त्यावर उतरले होते. या अांदोलनात मोठ्या प्रमाणात महिला होत्या. या वेळी सुधाकर पवार, किसन पवार, संतोष गोंधाले, आदी उपस्थित होते.

Next Article

Recommended