आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Young Man Unemployment Wearily Committed Suicide

बेरोजगारीला कंटाळून तरुणाने केली आत्महत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - बेरोजगारीला कंटाळून अभिजित सखाराम लाठकर (२४, रा. मेहरदत्तनगर, पिसादेवी) याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
अभिजित हा मूळ नांदेड येथील राहणारा होता. तेथेच तो एका खासगी महाविद्यालयात एमकॉमचे शिक्षण घेत होता. दोन वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचे छत्र हरपले. जबाबदारी असल्याने उदरनिर्वाहासाठी तो कुटुंबासोबत ऑक्टोबर २०१४ मध्ये औरंगाबादला आला. कामाचा शोध घेतला, परंतु काम काही मिळाले नाही. या नैराश्यातून त्याने बुधवारी रात्री ते ८.३० च्या दरम्यान घरच्या वरच्या मजल्यावर जाऊन धोतराने गळफास घेतला. घरातील मंडळींच्या लक्षात येताच त्यांनी त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्याला घाटीमध्ये पाठवले. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.