आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Theater, Pathanatyatuna Twenty Three Days 'Lake Shikwa ' Of Vigilant

नाटिका, पथनाट्यातून तेवीस दिवस ‘लेक शिकवा’चा जागर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या वतीने 3 ते 26 जानेवारीदरम्यान ‘लेक शिकवा’ हे अभियान राबवण्यात येणार आहे. विविध शाळांमध्ये नाटिका, पथनाट्य, पालकांशी संवाद या उपक्रमांच्या माध्यमातून यासंबंधी जनजागृती करण्यात येणार आहे. अभियानात लोकसहभाग वाढवण्यासाठी वैयक्तिक पातळीवरही प्रयत्न करण्याचा निर्धार शाळांनी केला आहे.


ग्रामीण भागातील आणि तळागाळातील मुलांपर्यंत शिक्षण हवे त्या प्रमाणात पोहोचू शकले नाही. त्यात मुलींच्या शिक्षणाबाबत उदासीनता दिसून येत आहे. या परिसरातील मुलींच्या पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यात येणार आहे. यात केवळ शासकीय नियमांचीच उजळणी न करता वैयक्तिक पातळीवर नाटिका, पथनाट्य, पालकांशी संवाद तसेच शाळा अर्धवट सोडलेल्या मुलींना संधी देणे या बरोबरच प्रवाहात आणण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. या अभियानाचा शुभारंभ शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान, पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत सेंट फ्रान्सिस शाळेच्या प्रांगणात शुक्रवारी (3 जानेवारी) होणार आहे.

पथनाट्यातून जनजागृतीचा प्रयोग
मुलींच्या शिक्षणासाठी शाळा नेहमीच प्रयत्न करत असते. यंदा ‘लेक शिकवा’ या अभियानांतर्गत पथनाट्याच्या माध्यमातूनही साक्षरतेविषयी जनजागृती करण्यात येणार आहे.
उज्ज्वला जाधव, पर्यवेक्षिका, शारदा कन्या प्रशाला


लोकसहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न
मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आम्ही लोकसहभाग वाढवण्यावर भर देणार आहोत. तसेच शाळा सोडलेल्या मुलींना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी पालकांमध्ये जागरूकता निर्माण करू.
आनंदा सूर्यवंशी, संचालक, उज्ज्वलाताई पवार स्कूल

पालकांचेही समुपदेशन
मुलींना शाळेत पाठवा, असे पालकांना सांगण्यापेक्षाही त्यांनी स्वत:हून मुलींच्या शिक्षणासाठी आग्रह धरावा याकरिता आम्ही पालकांसाठीच प्रथम समुपदेशन कार्यक्रम करणार आहोत.
एस. पी. जवळकर, ज्ञान प्रकाश विद्यामंदिर