आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लूट केलेल्या अपार्टमेंटशेजारीच दुसऱ्या दिवशीही धाडसी दरोडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद; दशमेशनगरात बुधवारी दुपारी ज्या शांतगंगा अपार्टमेंटमध्ये भामट्यांनी आर्किटेक्टला लुटले, तेथून केवळ दहा फुटांच्या अंतरावर असलेल्या आनंद निवास बंगल्यात गुरुवारी पहाटे चार चोरट्यांनी धुमाकूळ घातला. बंगल्यात एकटेच राहणारे ज्येष्ठ नागरिक मिश्रीलाल बरडिया (८०) यांना स्क्रू ड्रायव्हरचा धाक दाखवून सुमारे पाच लाखांचा ऐवज लुटला.
सेल्समन असल्याचा बनाव करत काल दोन चोरटे शांतगंगा अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या दिबेंदू मुखर्जींच्या घरात शिरले. चाकू दाखवून त्यांना मारहाण केली. त्यांचे हातपाय बांधले.
त्यांच्याकडील पाच लाखांचा ऐवज लुटून ते पळाले. त्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यामुळे रात्रीची गस्त वाढेल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात ते झाले नसल्याचे गुरुवारी पहाटे घडलेल्या घटनेवरून लक्षात येते. शांतगंगा अपार्टमेंटला लागूनच आनंद निवास हा भलामोठा बंगला आहे.
पंजाब नॅशनल बँकेच्या व्यवस्थापकपदावरून निवृत्त झालेले मिश्रीलाल तेथे एकटेच राहतात. त्यांचा मुलगा प्रवीण शासकीय दूध डेअरी समोरील एसबीआय कॉलनीत पत्नी, मुलांसह राहतात. त्यांचे रंगारगल्लीमध्ये इलेक्ट्रिकल्स दुकान आहे.
लोखंडीग्रील काढले : १५ऑक्टोबर रोजी पहाटे चारच्या सुमारास तोंडाला कपडा बांधून आलेले चार चोरटे बरडियांच्या बंगल्यात शिरले. मागील बाजूच्या खिडकीचे ग्रील स्क्रू ड्रायव्हरने उचकटून घरात प्रवेश केला. खोलीचा बाहेरून बंद असलेला दरवाजा अर्धा तोडून त्यांनी सर्व खोल्यांत शोधाशोध सुरू केली. त्याची चाहूल लागल्याने मिश्रीलाल जागे झाले. त्यांनी खोलीतील दिवा लावला. ते पाहून चोरटे लघुशंकेसाठी निघालेल्या मिश्रीलाल यांच्यासमोर उभे राहिले. स्क्रू ड्रायव्हरचा धाक दाखवून त्यांना ‘मुकाट्याने पलंगावर झोपा’ असे फर्मावले. जिवाच्या भीतीने मिश्रीलाल मुकाट्याने अाडवे पडले. त्यांच्या तोंडावर चादर टाकून चोरट्यांनी अर्ध्या तासात कपाटांची तोडफोड केली. दीड ते दोन लाख रुपये रोख सोन्या-चांदीचे दागिने घेऊन ते पहाटे पाचच्या सुमारास पसार झाले. मग मिश्रीलाल यांनी मुलगा प्रवीण यास मोबाइलवरून ही माहिती दिली. मग पोलिस आयुक्तांसह अनेक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या प्रकरणी उस्मानपुरा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

डीबी पथके बरखास्तीमुळे
गेल्याआठवड्यात पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी सर्व पोलिस ठाण्यातील डीबी पथके बरखास्त केली. उच्चभ्रू वसाहतीतील या लुटीच्या घटनांमुळे आयुक्तांनी पुन्हा पथके कार्यान्वित करावीत, असा प्रयत्न असल्याची चर्चा पोलिस दलात होती.

बँकेच्या सीसीटीव्हीत चोरटे कैद
आनंदनिवासातील दरोड्याचा तपास करताना पोलिसांना दशमेशनगर येथील कॉसमॉस बँकेच्या सीसीटीव्हीमध्ये दोन संशयास्पद व्यक्ती फिरताना आढळल्या. तेच लुटारू असावेत का, या दिशेने पोलिस तपास करत आहेत.

सेल्समनवर संशय
बुधवारीदिबेंदू यांच्या घरी आधी दोन पुस्तक विक्रेते आले होते. नंतर दोघांनी घरात घुसून दिबेंदूंना लुटले होते. मिश्रीलाल यांना लुटणारे हेच चौघे असावेत, असा कयास परिसरातील नागरिक व्यक्त करत होते.

गप्पराहणे पसंत
चोरट्यांनीमिश्रीलाल यांना मुकाट्याने झोपा असे फर्मावताना त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी एक चोरटा पलंगाजवळच उभा केला होता. दिव्य मराठी प्रतिनिधीला त्यांनी सांगितले की, खिडकीच्या पडद्यामागे ठेवलेला मोबाइल घ्यावा मुलाला कळवावे, असा विचार मनात येत होता. पण गप्प राहण्यातच शहाणपणा असल्याचे लक्षात आल्याने काहीच केले नाही.

तिची आठवण नेली
मिश्रीलालयांनी पत्नीची आठवण म्हणून दीड - दोन लाखांचे दागिने घरात ठेवले होते. ते लुटून नेल्याचे खूप दु:ख असल्याचेही त्यांनी वारंवार सांगितले.

चाबीकहां है...
चोरटेफक्त एकमेकात कुजबुजत होते. एकमेकांना ते हातवारे करून खुणावत होते. चौघांनीही तोंडावर रुमाल बांधला होता. सर्वांचा पेहराव जीन्स आणि काळ्या-पांढऱ्या चौकडीचा शर्ट असा होता. दिबेंदू मुखर्जी यांना लुटताना भामट्यांनी त्यांच्या तोंडात रुमाल कोंबला होता. बरडियांच्या घरात एक रुमाल सापडला. श्वानपथकातील श्वानाने त्यावरून मुख्य रस्त्यापर्यंतचा माग काढला.

घरफोडीदरम्यान चोरट्यांनी मिश्रीलाल बरडिया यांच्या घरातील सामान अस्ताव्यस्त केले. इन्सेट : चोरट्यांनी उचकटलेले खिडकीचे ग्रिल.