आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिडकीनमध्ये तीन ठिकाणी चोरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिडकीन - रामनगर भागात दोन ठिकाणी तर शेकटा रस्त्यालगतच्या शेतवस्तीवर झालेल्या चोरीत चोरट्यांनी मारहाण करत ९५ हजारांचा ऐवज लंपास केला. मारहाणीत तिघे जखमी झाले.
शेकटा रस्त्यावर असलेल्या शिंदे वस्तीवर गुरुवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास चोरी झाली. या वेळी चोरट्यांनी कुऱ्हाडीने मारहाण करत २१ हजार रोख व १७ हजारांचे सोने लंपास केले. या मारहाणीत भाऊसाहेब शिंदे ,संजय शिंदे हे दोघे जखमी झाले, त्यांच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कांताबाई शिंदे यांनी बिडकीन पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. चोरट्यांनी या अगोदर रामनगरात बेबी विठ्ठल सोनवणे तर ज्ञानेश्वर गंगाधर लघाने यांच्या घरी चोरी केली होती.
बातम्या आणखी आहेत...