आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरीला गेलेले दागिने परत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- स्कोडा कंपनीतील जराल्ड चार्ल्‍स जोसेफ (38) यांच्या घरातून 3 मे 2013 रोजी मध्यरात्री घर फोडून चोरट्यांनी नऊ तोळ्यांच्या दागिन्यांसह तीन घड्याळे, डीव्हीडी आणि 25 हजारांची रोकड पळवली होती. शनिवारी पोलिस निरीक्षक अशोक सोनवणे यांनी जोसेफ यांना मुद्देमाल परत केला.

याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिसांनी अटक केलेल्या दोन चोरट्यांकडून दागिने आणि वस्तू हस्तगत केल्या. जोसेफ यांचे सिडको एमआयडीसीतील उत्तरानगरीत लोकमान्य घरकुलमध्ये रो-हाऊस आहे. ते सहकुटुंब पुण्याला गेले असताना पाशू शहा अन्वर शहा (32) आणि शेख अब्दुल मोबीन शेख अब्दुल मुकीम (22) यांनी घर फोडत दागिने आणि वस्तू पळवल्या होत्या. गुन्हा दाखल झाल्यानंतर फिंगर प्रिंट, श्वानाने दिलेल्या इशार्‍यावरून पोलिसांनी शोध घेत 6 जून रोजी पाशू शहा, तर 12 जूनला अब्दुल मोबीनला अटक केली होती. त्यांनी चोरलेल्या सोन्याच्या बांगड्या श्रीराम फायनान्समध्ये ठेवल्या होत्या. यासह पोलिसांनी दोघांकडून 9 तोळ्यांचे दागिने, डीव्हीडी आणि घड्याळे हस्तगत केली. हस्तगत केलेले दागिने जोसेफ यांना दाखवण्यात आले. दागिन्यांची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी न्यायालयाला पत्र देऊन जोसेफ यांना दागिने परत करण्याबाबत विनंती केली. न्यायालयाच्या आदेशानंतर शनिवारी जोसेफ यांना दागिने देण्यात आले. या वेळी निरीक्षक अशोक सोनवणे, उपनिरीक्षक अनिल वाघ, सतीश जाधव, भगवान शिलोटे, दिलीप भताने, अशोक वारे यांची उपस्थिती होती. दरम्यान,सोनवणे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी शिताफीने दागिने व वस्तू हस्तगत केल्याचे जोसेफ यांनी सांगितले.