आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

छावणीत 4 दुकाने फोडली, दुचाकी चोरीची असण्याची शक्यता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - छावणीच्या मुख्य बाजारपेठेतील चार दुकाने शनिवारी पहाटे चोरट्यांनी फोडली. दोन दुकानांतून १६ हजार रुपये रोख केक असे साहित्य चोरून नेले. पहाटे साडेचार ते पावणेपाचच्या सुमारास रॉयल टोबॅकोचे मालक वडिलांना भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जात असताना त्यांना दुकानाचे शटर उचकटल्याचे दिसले. तसेच इतरही काही दुकाने फोडल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी पोलिसांना कळवले. एका दुकानाजवळ दुचाकी सोडून चोरटे पसार झाले.
शनिवारी पहाटे चोरट्यांनी मुख्य बाजारपेठेतील रॉयल टोबॅको हे दुकान फोडले. दुकानात फर्निचर, डी फ्रिज, बाॅटल कूलर आणि बाहेर चिप्ससाठीचे रॅक ठेवून मालक सय्यद मुबिनउर रहमान यांनी शुक्रवारी रात्री दुकान बंद केले. त्यामुळे दुकानात पाय ठेवण्यासाठी जागा नव्हती. चोरट्यांना शटर उचकटल्यानंतर दुकानात जाण्यासाठी जागाच नसल्याने त्यांनी शेजारच्या दुकानांकडे मोर्चा वळवला. त्यांनी इम्रान खान यांच्या डिलक्स शोरूमचे शटर उचकटले. दुकानाच्या गल्ल्यातील रोख हजार रुपये आणि दोनशे रुपये किमतीचा केक चोरला. बाजूलाच पायऱ्यांवर बसून केक फस्त करत उरलेला केक तेथेच फेकून दिला. त्यानंतर डिलक्स शोरूमच्या जवळच असलेल्या रहमान खान यांच्या आर. के. मंडपचे शटर उचकटले. तेथे भांड्यांशिवाय काहीच नव्हते. त्यामुळे त्यांनी आपला मोर्चा दर्जी गल्लीकडे वळवला. तेथील अब्बास खान यांच्या स्टार मेडिकलचे शटर उचकटून गल्ल्यातून हजार रुपये चोरले. चोरटे ज्या दुचाकीवर आले ती दुचाकी (एमएच २० बीएफ ११२२) तेथेच टाकून पसार झाले. ही दुचाकी छावणी पोलिसांनी ताब्यात घेतली.

सीसीटीव्हीत अस्पष्ट चेहरे
या परिसरात रात्री बहुतांश पथदिवे बंद होते. एका दारू दुकानासमोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे तोंड बाजूला फिरवले असल्यामुळे त्यामध्ये काहीच आढळून आले नाही. स्टार मेडिकलसमोरील एका जनरल स्टोअर्समध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवला अाहे. परंतु त्यामध्ये काहीच रेकॉर्डिंग झाले नाही. पहाटे चार वाजून एक मिनिटांनी दुचाकीवर दोघे जण मेडिकल स्टाेअर्सवर आल्याचे त्यात दिसत आहे. परंतु या दुचाकीस्वारांचा चेहरा स्पष्ट दिसत नाही. घटनास्थळाची गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त खुशालचंद बाहेती यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक रेश्मा सौदागर आणि श्वानपथकाने पाहणी केली. छावणी ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक बी. के. धनेधर पुढील तपास करीत आहेत.

चोरट्यांनी सोडून दिलेली दुचाकी चोरीची असण्याची शक्यता आहे. ही दुचाकी दलालवाडीतील सय्यद अन्वर सय्यद युसूफ यांच्या नावाने आरटीओ कार्यालयात नोंदणी केलेली आहे.
बातम्या आणखी आहेत...