आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरवस्तीत चोरी; बाबा रामदेव मंदिरातील सर्व दागिने लंपास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पैठणगेट परिसरातील जरीपु-यात भरवस्तीत असलेल्या बाबा रामदेवजी मंदिरातून चोरट्यांनी मंगळवारी रात्री दोन दरवाजांची कुलपे तोडून ८७ तोळे वजनाचे चांदीचे दागिने लंपास केले. त्यांचे मूल्य अंदाजे लाख रुपये आहे. मंदिरात चोरी झाल्याची बाब बुधवारी सकाळी वाजता पुजारी नरेंद्र भाऊलाल प्रसाद यांच्या निदर्शनास आली. मंगळवारी रात्री साडेआठ वाजता त्यांनी मंदिर कुलूपबंद केले होते. सन 1965 ला मंदिराची प्रतिष्ठापना झाल्यानंतर चोरी होण्याची ही पहिलीच घटना आहे.
पुजारी नरेंद्र प्रसाद यांना सकाळी मंदिराचा मुख्य दरवाजा तसेच आतील दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसले. त्यामुळे त्यांनी अासपासच्या रहिवाशांना बोलावले. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. श्वानाच्या मदतीने पोलिसांनी एक तास घटनास्थळी चोरट्यांचा माग घेतला. मात्र, काहीच सुगावा लागला नाही. या प्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून निरीक्षक गोवर्धन कोळेकर, उपनिरीक्षक सज्जन नोहेडा यांच्यासह गुन्हे शाखेचे पथक तपास करत आहे.
तीनसंशयितांची चौकशी
दरम्यान,पोलिसांनी मंदिराच्या परिसरातीलच तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून ते गांधीनगर येथील रहिवासी असल्याचे समजते. सायंकाळपर्यंत त्यांच्याकडून काहीही माहिती मिळाली नव्हती.
सीसीटीव्ही असता तर फायदा
मंदिराच्याव्यवस्थापनाने सीसीटीव्ही बसवणे चांगले राहील. कारण त्यामुळे कोणी मंदिरात प्रवेश करणार नाही. मात्र जोपर्यंत सीसीटीव्ही नाही तोपर्यंत सुरक्षा रक्षक नेमावा, म्हणजे अशा चोरीच्या घटना होणार नाहीत. परंतु सीसीटीव्ही असता तर तपास गतीने झाला असता. अरविंदचावरिया, उपायुक्त.

दागिन्यांवरच होते चोरट्यांचे लक्ष
चोरट्यांनीमुख्य दरवाजाचे कुलूप तोडले. नंतर मंदिराच्या देव्हाऱ्याच्या दाराचेही कुलूप तोडून आत प्रवेश केला. तेथील सर्व दागिने काढून घेऊन चोरटे पसार झाले. त्यांनी तेथील दानपेट्यांना हातही लावला नाही, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे चोरटे परिसरातीलच असावेत आणि त्याची संख्या तीन ते चार असावी, असा पोलिसांचा कयास आहे.
हडको मंदिरातून मूर्ती चोरीला गेल्या; सापडल्या फक्त : हडकोएन- ११ येथील जैन मंदिरातून एक वर्षापूर्वी पंचधातूच्या मूर्ती चोरीला गेल्या होत्या. तपासात दोनच मूर्ती सापडल्या. त्यानंतर तिथे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. त्यानंतर इतर जैन मंदिरांतही असे कॅमेरे लावले गेले. तेव्हापासून जैन मंदिरात चोरी झालेली नाही.
शहरातील राजाबाजार येथील जैन मंदिरात फेब्रुवारी २०१४ मध्ये मूर्ती चोरीस गेली होती. मात्र, तेथे सीसीटीव्ही कॅमेरे असल्याचे चोरट्यांना माहीत नव्हते. ही चोरी आणि चोरटे सीसीटीव्हीत कैद झाल्यामुळे सकाळी चोरी तर उघडकीस आलीच, त्याचबरोबर चोरट्यांचे चेहरेही समोर आले होते. आपली चोरी पकडली जाईल, असे दिसताच या चोरट्यांनी मनपाजवळील नाल्यात मूर्ती तसेच अन्य दागिने टाकून दिले होते. त्यानंतर नागरिकांनी चोरट्यांना पकडून पोलिसांच्या हवाली केले होते.
श्वानपथकही ठरले अपयशी
चोरीचीमाहिती मिळाल्यानंतर दहा वाजता पोलिस मंदिरात दाखल झाले. त्यांच्यासोबत लुसी हे श्वानही होते. ती मंदिर परिसरात असलेल्या मनपा शाळेजवळ काही वेळ घुटमळली. पण पुढे जाऊ शकली नाही.