आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घराचे कुलूप तोडून ९२ हजारांचा ऐवज लंपास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - घरातील सर्व कुटुंब बाहेर गेल्याची संधी साधत चोरट्यांनी कुलूप तोडून रोख रकमेसह मंगळसूत्र दागिने असा ९२ हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० ते १.३० वाजेच्या सुमारास गारखेडा परिसरातील आनंदनगर येथे घडली.
चंद्रकला चंद्रभान पाटील (४०) या मुलगा सुनेसह सामान खरेदीसाठी घराला कुलूप लावून बाहेर गेल्या होत्या. हीच संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून लोखंडी कपाटातील ५० हजार रोख, २४ हजारांचे मंगळसूत्र १८ हजारांचे कानातील झुंबर असा ९२ हजारांचा ऐवज चोरून नेला. दरम्यान, या घटनेनंतर चंद्रकला पाटील यांच्या शेजारी राहणाऱ्या दोघा तरुणांनी मद्यप्राशन करून त्यांना चोरीला गेलेला माल मिळवून देतो म्हणत पैशांची मागणी केली होती. यामुळे पाटील यांनी पुंडलिकनगर पोलिस चौकी गाठत चोरीची तक्रार दिली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राजपूत करत आहेत.