आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेदरलेले चोर सोने टाकून पळाले, प्रा. लुलेकरांना दिलासा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आवाजकानी पडताच भेदरलेल्या चोरट्यांनी हाती आलेला माल तेवढा घेऊन पळ काढला. कपाटातील एकूण १७ तोळे सोन्यापैकी दहा तोळे सोने घरातच सापडले. हा प्रकार मंगळवारी पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाला. यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मराठी विभागातील प्रा. डॉ. प्रल्हाद गोविंद लुलेकर यांना हायसे वाटले.
प्रा. लुलेकरांच्या गारखेडा येथील सारंग हाउसिंग सोसायटीमधील घरी सोमवारी भरदिवसा घरफोडी झाली होती. कपाटात १७ तोळे सोन्याचे दागिने आणि २५ हजार रुपये रोख होते. प्रथमदर्शनी सर्वच ऐवज चोरीस गेला असे त्यांना वाटले होते. त्यामुळे त्यांनी तशी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी तपास केला असता, दहा तोळ्यांचे दागिने घरातच सापडले, अशी माहिती मुकुंदवाडी ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक दिनेश सोनवणे यांनी दिली. चोरी करतेवेळी मध्येच दरवाजाचा अथवा अन्य कशाचा तरी आवाज झाल्यामुळे चोरटे घाबरले आणि पळ काढण्याच्या प्रयत्नात हातातील ऐवज खाली पडला आणि त्यातील दहा तोळ्यांचे दागिने घटनास्थळीच पडले असा कयास पोलिसांनी व्यक्त केला. सहायक पोलिस आयुक्त सुखदेव चौघुले, पोलिस निरीक्षक उत्तम मुंढे, उपनिरीक्षक दिनेश सोनवणे, जमादार गणी, पदार, बनकर यांनी तपास केला