आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हडकोत एकापाठोपाठ दोन तर वाळूजमध्ये एका कंपनीचे गोदाम फोडले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शहरातीलिसडको आणि हडको भागातील दोन घरे फोडून चोरट्यांनी पावणेदोन लाख तसेच वाळूज परिसरातील आसेगाव येथील एका कंपनीचे गोदाम फोडून सुमारे अडीच लाख असा एकूण चार लाखांचा ऐवज लांबवला.
हडको एन-११ मधील रहिवासी उज्ज्वला माणिकचंद चुडीवाल (५२) कुटुंबीयांसह त्र्यंबकेश्वरला गेल्या होत्या. दरम्यान, चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून कपाटातील रोख ८० हजार रुपये आणि सोन्या-चांदीचे दागिने असा लाख ६२ हजारांचा माल लांबवला. चुडीवाल यांच्या शेजाऱ्यांनी शुक्रवारी चोरीचे वृत्त त्यांना कळवले. चुडीवाल कुटुंब रविवारी सकाळी शहरात दाखल झाले. त्यांनी सिडको पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी श्वान पथकाच्या माध्यमातून तपासणी केली. पोलिस उपनिरीक्षक विशाल टकले तपास करत आहेत.
वाळूजमध्ये गोदाम फोडले
वाळूजपरिसरातील आसेगाव येथील राजेश्री स्पन पाइप या कंपनीच्या गोदामातील शटर उचकटून चोरट्यांनी लाख ३८ हजार ८०० रुपये किमतीचे साहित्य लांबवले. ही घटना २४ ऑगस्टच्या पहाटे घडली. कास्टिंग इंिड्रक्स, जनरेटरचे सुटे भाग लंपास केले आहेत. एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात अजय प्रकाश जैन यांच्या फिर्यादीनुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक रेश्मा सौदागर तपास करत आहेत.
याच भागात झाली दुसरी घरफोडी
हडकोतीलगजानननगरपाठोपाठ रवीनगरमध्येही घरफोडी झाली. चोरट्यांनी येथेही दाराचा कडीकोंयडा तोडून साडेअकरा हजारांचे दागनिे चोरून नेले. राजू लक्ष्मण कलात्रे बाहेरगावी गेले होते. त्यांनाही शेजाऱ्यानेच घटनेची माहिती दिली. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. दोन्ही घरफोड्या एकाच टोळीने केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तपास जमादार पठाण करत आहेत. या भागात पोलिसांची गस्त कमी झाल्याने घरफोडीचे प्रकार वाढले आहेत, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.