आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वातंत्र्यसैनिक कॉलनीत एकाच रात्री घरफोड्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद -शेजारच्या घराची बाहेरून कडी लावून बाजूच्या दोन घरांत चोरट्यांनी घरफोडी केली. ही घटना सोमवारी रात्री औरंगपुऱ्यातील जिल्हा परिषद मैदानाजवळील स्वातंत्र्यसैनिक कॉलनीत घडली. दोन्ही घरमालक बाहेरगावी गेले आहेत. चोरट्यांनी ३९ हजार रुपयांची चांदीची भांडी लांबवली.

प्रफुल्ल नानासाहेब जेथे यांचे स्वातंत्र्यसैनिक कॉलनीत दुमजली घर आहे. वरच्या मजल्यावर ते स्वत: राहतात, तर खालचा मजला त्यांनी विजय कुलकर्णी आणि आनंद सिंग यांना भाड्याने दिला आहे. जेथे हे नातेवाइकाच्या लग्नासाठी २३ जानेवारीपासून नाशिकला गेले होते, तर कुलकर्णीही गावाला गेले आहेत. चोरटे मध्यरात्रीनंतर संरक्षक भिंतीवरून उडी मारून आत शिरले. सिंग यांच्या घराला कडी लावून कुलकर्णी यांचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर वरच्या मजल्यावरील जेथे यांच्या घराचा दरवाजा तोडून आत घुसले आणि ३९ हजार रुपये किमतीचा ऐवज लांबवला.आज पहाटे हा प्रकार निदर्शनास आला.