आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिनाभरात मोरे चौकातील दुकाने फोडली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - गेल्या महिनाभरात मोरे चौकातील सहा दुकाने चोरट्यांनी फोडली. विशेष म्हणजे यातील एका दुकानात तब्बल तीन वेळा चोरी झाली तर एक वेळ फोडण्याचा प्रयत्न झाला. या सर्व घटना वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यापासून अवघ्या ५०० मीटर अंतरावरच घडल्याने गस्तीवरील पोलिस काय करतात, असा प्रश्न व्यापाऱ्यांतून उपस्थित होत आहे. या घटनांशिवाय दुकानांमध्ये लहानमोठ्या चोऱ्या झाल्याचे व्यापारी सांगतात. मात्र, पोलिसांचा ससेमिरा मागे लावून घेण्यापेक्षा किरकोळ चोरीची तक्रार देणेच बरे, असे म्हणत अनेकजण टाळाटाळ करतात.
मोरे चौक परिसरातील जय मल्हार इलेक्ट्रॉनिक्स दुकानातील मोबाइल एलईडी टीव्ही आठ दिवसांपूर्वींच लंपास करण्यात आल्या. याच चौकातील कदम मोबाइल शॉपी सिद्धार्थ एंटरप्रायझेस या दोन दुकानांचे शटर उचकटून चोरी केल्याची घटना सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. मात्र,गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ करत असल्याचे दुकान मालक सुनील शांतीलाल जैन यांनी सांगितले. जैन यांनी सप्टेंबर रोजी रात्री दुकान बंद केले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ते दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना दुकानाचे शटर उचकटलेले दिसले. त्यांनी तत्काळ घटनेची माहिती पोलिसांना दिली. चोरट्यांनी हार्डवेअर दुकानातील २५ ते ३० हजार रुपये किमतीचा माल तसेच रोख ८०० रुपये लंपास केल्याचे जैन यांनी सांगितले. मात्र, त्यांनी तक्रार दिलीच नाही, असे पोलिसांनी सांगितले.

चॅनलगेटमुळे चोरी टळली : जैनयांच्या दुकानासमोरील विजय वाघचौरे यांच्या मोबाइल शॉपी दुकानात चोरीसाठी आलेल्या चोरट्यांनी दुकानाबाहेरील सीसीटीव्ही कॅमेरा तोडला. त्यानंतर दुकानाचे शटर उचकटले. मात्र,आतील चॅनल गेटमुळे चोरट्यांना आत प्रवेश करता आला नाही. २४ जुलै रोजी साईराज मोबाइल शॉपीत चोरी झाल्याने वाघचौरे यांनी खबरदारी घेत शटरच्या आतून चॅनल गेट बसवले होते. त्यामुळे दुकानातील लाखोंचा माल सुरक्षित राहिल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.

टोळीच सक्रिय : याचोरीच्या घटनांवरून एक टोळीच कार्यरत असल्याचे दिसते. दुकानांचे शटर तोडण्याची पद्धत तसेच सीसीटीव्ही कॅमेरे फोडणे, सीसीटीव्हीचा डीव्हीआर बॉक्स लंपास करणे आदी प्रकारांवरून या चोऱ्या एकच टोळी करीत असल्याचा संशय आहे.
बातम्या आणखी आहेत...