आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Theft News In Marathi, Chain Thief Issue At Aurangabad, Divya Marathi

औरंगाबादमध्‍ये मंगळसूत्र चोरीचे सत्र सुरु, सलग तिसरी घटना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- कामगार चौकातून घराकडे परतणार्‍या शिक्षिकेचे भरदुपारी दोनच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या चोराने मंगळसूत्र हिसकावत पळ काढला. शिक्षिकेने मंगळसूत्र हातात दाबून ठेवल्याने चोराच्या हाती एक तोळ्याचे मंगळसूत्र लागले. ज्योती चंद्रशेखर दामोदर (40, रा. कमल हाउसिंग सोसायटी, एन-3, सिडको) असे शिक्षिकेचे नाव आहे. सतत तीन
3 दिवसांपासून मंगळसूत्र पळवण्याचे प्रकार घडत आहेत.
ज्योती दामोदर या शुक्रवारी दुपारी मैत्रिणीला भेटून परतताना समोरून येणार्‍या दुचाकीस्वारांनी त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रसंगावधान ओळखलेल्या ज्योती यांनी मंगळसूत्र हातात धरून ठेवले. त्यामुळे चोराच्या हाती एक तोळ्याचेच मंगळसूत्र लागले. घटनेनंतर ज्योती यांनी आरडाओरड केली. मात्र, तोपर्यंत चोर पसार झाला होता. यानंतर ज्योती यांनी मुकुंदवाडी पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. सलग तिसर्‍या दिवशी मंगळसूत्र हिसकावण्याची घटना घडली आहे. यापूर्वी बुधवारी एन-8 मधील माधुरी मांडे यांचे, तर गुरुवारी सर्मथनगरातील आशालता कोयाळकर यांचे मंगळसूत्र हिसकावल्याचा प्रकार घडलेला आहे.