आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी ३१ हजारांच्या सोन्याची; परत मिळाले तेव्हा झाले दीड लाखाचे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चोरी गेलेला मुद्देमाल परत मिळाल्यानंतर आकर्षक वेष्टनातील भेटवस्तूंना न्याहाळताना एक दांपत्य छाया : मनोज पराती - Divya Marathi
चोरी गेलेला मुद्देमाल परत मिळाल्यानंतर आकर्षक वेष्टनातील भेटवस्तूंना न्याहाळताना एक दांपत्य छाया : मनोज पराती
औरंगाबाद- कानूनके घर में देर है पर अंधेर नही, अशी प्रतिक्रिया पोलिस आयुक्तालयाच्या आवारात मंगळवारी अनेकांच्या तोंडातून उत्स्फूर्तपणे आली. मागील दहा-बारा वर्षांत चोरीला गेलेला सुमारे ३५ लाखांचा मुद्देमाल फिर्यादींना पोलिसांकडून परत देण्यात आला. भेटवस्तूंप्रमाणे आकर्षक वेष्टनात पोलिसांकडून मिळालेल्या या सुखद ठेव्याने अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते या वस्तू संबंधितांना परत देण्यात आल्या.

एखादी वस्तू चोरीला गेली की ती पुन्हा मिळणे अशक्यच आहे, त्यातही ही वस्तू दहा वर्षांपूर्वी चोरीला गेली असली तर अपेक्षाच सोडा. मात्र, पोलिसांनी ही अशक्य गोष्ट शक्य करून दाखवत औरंगाबादकरांना आनंदाचा धक्का दिला. मोबाइल, दुचाकी, सोने-चांदीचे भांडे, अगदी रोख रक्कमसुद्धा या वेळी पोलिसांनी फिर्यादींना परत केली. चोरीच्या अनेक प्रकरणांतील पूर्ण मुद्देमाल परत मिळाला नाही. मात्र, जो रिकव्हर झाला तो पोलिसांनी अगदी गिफ्ट पेपरमध्ये बांधून साभार परत केला. ६४ प्रकरणांतील मुद्देमाल या वेळी परत करण्यात आला. आयुक्तालयातील सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पोलिस उपायुक्त वसंत परदेशी, संदीप आटुळे, सहायक आयुक्त रमेश गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी १५ पोलिस ठाण्यांचे सर्व पोलिस निरीक्षक उपस्थित होते. चोरीला गेलेल्या वस्तू परत मिळाल्यामुळे फिर्यादींचे चेहरे खुलले होते. ते पाहून संबंधित कामगिरी करणाऱ्या पोलिस निरीक्षकांच्या चेहऱ्यावर कामाचे समाधान स्पष्ट दिसत होते.
पोलिसांकडून अनोखे गिफ्ट देर है अंधेर नही, ६४ प्रकरणांतील ३५ लाखांचा मुद्देमाल परत
सन २००२ मध्ये उस्मानपुऱ्यातील श्रेयनगरमध्ये भाड्याच्या घरात राहाणारे योगेंद्र जोशी यांना त्यावेळी चोरीला गेलेले सहा तोळे सोने आज परत मिळाले. त्यामुळे ते आनंदात होते. ज्या वेळी हे साेने चोरीला गेले त्या वेळी त्याचा दर होता ५२३० रुपये तोळा. म्हणजे एकूण किंमत ३१,३८० रुपये. ही रक्कम जोशी यांनी त्या वेळी बँकेत ठेवली असती आणि ती ७२ महिन्यांनी दाम दुप्पट झाली असती तरी टीडीएस वजा जाता सव्वा लाखापेक्षा कमीच परतावा त्यांना मिळाला असता. आज जे सोने त्यांना परत मिळाले आहे त्याची किंमत १.५६ लाख रुपये आहे. म्हणजे योगेंद्र जोशींचा फायदा आहेच. २००८ मध्येच पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केला होता. तो मिळायलाही सात वर्षे जावी लागली. त्यामुळे त्यांचा आनंद अधिक आहे. सिडकोतील दिघे यांचे मंगळसूत्र चोरीला गेले होते, ते पोलिस निरीक्षक राजकुमार डोंगरे, हरीश खटावकर यांनी काही दिवसांत रिकव्हर केले होते. या महिलेला ते स्वीकारताना आनंदाश्रू आवरले नाहीत.

असा आहे परत केलेला मुद्देमाल
६४
0२
०१
१७
२६
०२ प्रकरणे
१७ नागरिक
एकूण
लॅपटॉप
टॅब
मोबाइल
दुचाकी
रोख रक्कम
सोन्याचे दागिने
~३५,४,९८०
~७४ हजार ४००
~३६ हजार ८४०
~१,५४,६४०
~१४ लाख रुपये
~६,८९,९००
४३७.३८० ग्रॅम ~११,४९,९००
यांनी केले विशेष प्रयत्न
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी हा माल परत देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. यातील बहुतांश मुद्देमाल चोरांकडून परत मिळवण्यात पोलिस यशस्वी झाले होते. मात्र, न्यायालयीन प्रक्रियेतून तो सोडवायचा राहिला होता. त्यासाठी आयुक्तांनी विशेष कर्मचारी नेमले. काही महिन्यांपूर्वी विधी अभ्यासक्रमाचे काही विद्यार्थी पोलिसांसोबत इंटर्नशिप करत होते. त्यांनाही हे काम देण्यात आले होते.