आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेची पर्स चोरली; सोनसाखळी लंपास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- बाजारात खरेदीसाठी आलेल्या महिलेची दोन तोळय़ांची सोनसाखळी आणि साडेनऊ हजार रुपये रोख रक्कम असलेली पर्स चोराने पळवली. ही घटना बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास सिटी चौक ते मछली खडक या भागात घडली.

बुधवारी सायंकाळी सातारा परिसरातील मीनाबाई प्रकाश बरंडवाल (45, रा. संत रोहिदास गृहनिर्माण संस्था, गट क्र. 82) या सोनसाखळीला डाग देण्यासाठी सराफा बाजारात गेल्या होत्या.

या वेळी त्यांची सून आणि नातूदेखील सोबत होते. सोनसाखळीला डाग दिल्यानंतर ती एका छोट्या पर्समध्ये ठेवली. ही छोटी पर्स मोठय़ा पर्समध्ये ठेवून त्या मछली खडक येथे आल्या. तेथे नातवासाठी सफरचंद घेतल्यानंतर त्यांनी पैसे देण्यासाठी पर्स उघडली.

मात्र, या वेळी दोन तोळय़ांची सोनसाखळी आणि साडेनऊ हजार रुपये असलेली पर्स चोराने लंपास केल्याचे निदर्शनास आले. यानंतर त्यांनी सिटी चौक पोलिस ठाणे गाठत अज्ञात चोराविरुद्ध तक्रार दिली. यावरून चोरीचा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास जमादार विष्णू मुंडे करीत आहेत.