आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी गेलेल्या दुचाकीचा फेसबुकद्वारे शोध सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - वाळूज औद्योगिक परिसरातील सिमेन्स कंपनीसमोर उभी करण्यात आलेली दुचाकी ३० मिनिटांमध्येच लंपास झाल्याची घटना मंगळवारी (११ नोव्हेंबर) दुपारी घडली. मात्र, याबाबत पोलिस ठाण्यात नोंद न करता वाट पाहण्याचा सल्ला पोलिसांनीच दिला. त्यामुळे दुचाकी मालकाने फेसबुकवर दुचाकी शोधण्याचे आवाहन केले आहे.
वाळूज औद्योगिक क्षेत्रातील सिमेन्स कंपनी गेटसमोर विलास भोसले यांनी मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास दुचाकी हीरो होंडा स्प्लेंडर (एमएच १२ ईएच ३१७४) उभी करून कंपनीत गेले. अवघ्या अर्ध्या तासानंतर परतलेल्या भोसले यांना त्यांची दुचाकी न िदसल्यामुळे त्यांनी परिसरात शोधाशोध सुरू केली. कंपनीच्या सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजही तपासून पाहिले. शेवटी त्यांनी वाळूज एमआयडीसी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन शोधाशोध केली.
मात्र, हाताशी काही न लागल्यामुळे पोलिस रिकाम्या हाताने परतले. दुचाकी मित्र वगैरे कोणी घेऊन गेले असणार, दोन दिवस वाट पाहू, असा सल्ला पोलिसांनीच दिल्याचे भोसले यांनी सांगितले.
दुसरी घटना
सदरील दुचाकी शोधण्यासाठी दत्तात्रय वर्पे यांच्या फेसबुक वाॅलवर सदरची पोस्ट टाकली आहे. अशा प्रकारे दुचाकी हरवल्याची पोस्ट फेसबुकच्या माध्यमातून पोस्ट केल्याची या परिसरातील ही दुसरी घटना आहे.