आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महानोरांच्या ‘पानमळ्या’वर चोरट्यांचा मध्यरात्री धुडगूस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोयगाव - पद्मश्री कवी ना.धों. महानोर यांच्या पळसखेडा (ता. सोयगाव) येथील ‘पानमळा’ या निवासस्थानी चोरट्यांनी धुमाकूळ घालून फोटो, कपडे, पुरस्कार आदी वस्तू अस्ताव्यस्त फेकल्या. ही घटना ६ मे रोजी रात्री घडली.

६ मे रोजी रात्री काही चोरटे घरात शिरले. दोन खोल्यांचे कुलूप तोडून सुटकेसमधील फोटो, पुरस्कार व इतर साहित्य इतरत्र फेकले. मौल्यवान वस्तू ठेवलेल्या खोलीचे कुलूप तोडण्याचा प्रयत्नही केला. दरम्यान, या घटनेत आर्थिक फटका बसलेला नाही, केवळ वस्तू, महत्त्वाची कागदपत्रे अस्ताव्यस्त फेकली. खुर्च्यांची मोडतोड केल्याचे प्रफुल्ल महानोर यांनी सांगितले. याप्रकरणी तक्रार आलेली नाही, असे पोलिस निरीक्षक संतोष घाटेकर यांनी सांगितले.