आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरट्यांचा उच्छाद; महिलेची पर्स, लाखाचे गंठण हिसकावले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - काही दिवसांपासून शहरात चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. बीएसएनएल कार्यालयासमोर विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकीस्वाराने महिलेचा मोबाइल पर्स असा एकूण अठरा हजार पाचशे रुपयांचा एेवज हिसकावून नेला, तर दुसऱ्या एका घटनेत शतपावली करीत असलेल्या महिलेच्या गळ्यातील गंठण विनाक्रमांकाच्या दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने तोडून नेले. या प्रकरणी सिडको आणि सातारा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.

सिडको एन-५ येथील करणसिंग हरिश्चंद्र राजपूत हे बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास आपल्या पत्नीसोबत दुचाकीवरून जात होते. हे दांपत्य बीएसएनएल कार्यालयासमोर असताना करणसिंग यांना फोन आल्याने त्यांनी गाडी थांबवली ते फोनवर बोलत असताना विरुद्ध दिशेने आलेल्या अज्ञात दुचाकीस्वाराने त्यांच्या पत्नीची पर्स हिसकावून नेली. पर्समध्ये सोनी कंपनीचा मोबाइल, एटीएम कार्ड,पॅनकार्ड काही रोख रक्कम असा अठरा हजार पाचशे रुपयांचा एेवज होता. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रामचंद्र पवार करत आहेत.

आलोकनगर येथील विजया बाबासाहेब ढवळे या बुधवारी जेवणानंतर रात्री साडेदहाच्या सुमारास पायी फिरण्यासाठी मैत्रिणीसोबत बाहेर पडल्या होत्या. महाराणा प्रताप शाळेजवळ एका विनाक्रमांकाच्या दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील एक लाख रुपये किंमतीचे गंठण हिसकावून नेले. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.