आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयटीआयच्या वसतिगृहात सुविधांअभावी होतेय आबाळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(आयटीआय वसतिगृहात विद्यार्थ्यांना सुविधा मिळत नाहीत. छाया: रवी खंडाळकर )
औरंगाबाद- उद्योगात जास्तीत जास्त रोजगार संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने मेक इंडियाची हाक देण्यात आली आहे. राज्य सरकारही त्याच दिशेने वाटचाल करत आहे. परंतु कुशल मनुष्यबळ निर्माण करणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या (आयटीआय) बाबतीत मात्र सरकारची अनास्था दिसून येते. येथील आयटीआयच्या विद्यार्थी वसतिगृहात सुविधांअभावी विद्यार्थ्यांची अबाळ होत आहे.
गेल्या सात-आठ वर्षांपासून सुविधांबाबतच्या प्रस्तावावर कोणताच निर्णय झालेला नाही. त्यामुळे मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्राचे ढोल बडवणाऱ्या सरकारला मेक इन औरंगाबादचा मात्र विसर पडला आहे, असे आयटीआयच्या विद्यार्थ्यांचे मत बनले आहे. या संस्थेत ग्रामीण भागातून विद्यार्थी येतात. त्यांना राहण्यासाठी आयटीआयचे तीनमजली वसतिगृह आहे. मात्र, तिथे कोणतीही सुरक्षा नाही, दाराखिडक्यांची अत्यंत वाईट अवस्था आहे, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय नाही, आरोग्य सुविधांच्या बाबतीतही आलबेल आहे. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी वारंवार आंदोलने केली. सुविधा पुरवण्यासंदभातील अनेक प्रस्तावही वर्षानुवर्षे प्राचार्यांनी दिले.
त्यावर कोणत्याच प्रकारची चर्चा नाही की साधे लोकप्रतिनिधीही विद्यार्थ्यांची दुरवस्था पाहण्यास आलेले नाहीत. आयटीआयमधून प्रशिक्षण घेणारा विद्यार्थी उद्याचा कुशल कारागीर आहे. आज उद्योग क्षेत्रालाही या कुशल मनुष्यबळाची गरज आहे. मात्र, मेक इंिडयाच्या माध्यमातून देशात परिवर्तन घडवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सरकारलाच याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही, अशी परिस्थिती दिसते. वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी एक हजार रुपये डिपॉझिट घेतले जातात.

बाराशे ते दीड हजार रुपयांपर्यंत वर्षाची फी असून यात यंदा वाढ करण्यात आली आहे. तीनशे विद्यार्थी क्षमता असणाऱ्या या वसतिगृहात यंदा केवळ ३० विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतल्याची माहिती आयटीआयमधील अधिकाऱ्यांनी दिली. आसपासच्या वस्तीतील वाईट प्रवृत्तींचाही इथे त्रास आहे.
शासनाला वारंवार प्रस्ताव दिले आहेत
- वसतिगृहाच्या स्थितीबद्दल सरकारला वारंवार प्रस्ताव देण्यात आले आहेत. मात्र, कोणतेच सहकार्य आतापर्यंत मिळाले नाही. यासंदर्भात आम्ही लवकरच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना प्रस्ताव देणार आहोत.
जी.बी. दंदे, प्राचार्य, आयटीआय
सोयच नसेल तर प्रवेश कसा घेणार?
- मी ग्रामीण भागातून येथे प्रवेशासाठी आलो आहे. मात्र, इथे राहण्यासाठी असलेल्या वसतिगृहाची अत्यंत वाईट अवस्था आहे. शिवाय सुरक्षितताही नाही. त्यामुळे वसतिगृहाऐवजी बाहेर रूम करून राहण्याशिवाय पर्याय नाही.
प्रकाश इंगळे, विद्यार्थी
बातम्या आणखी आहेत...