आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थितीचा अंदाजच आल्याने गेली कृत्रिम पावसाचीही वेळ, मराठवाड्यावर भयंकर दुष्काळाचे सावट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नुसताच शिडकावा.. मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यांना भरपूर पावसाची प्रतीक्षा असताना बुधवारी रात्री वाजेच्या सुमारास पावसाचा थोडा शिडकावा झाला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या दोन दिवसांत मोठ्या पावसाची शक्यता आहे. छाया : अरुण तळेकर - Divya Marathi
नुसताच शिडकावा.. मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यांना भरपूर पावसाची प्रतीक्षा असताना बुधवारी रात्री वाजेच्या सुमारास पावसाचा थोडा शिडकावा झाला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या दोन दिवसांत मोठ्या पावसाची शक्यता आहे. छाया : अरुण तळेकर
औरंगाबाद- सलग तीन वर्षे दुष्काळात होरपळलेला मराठवाडा यंदाही मागच्यापेक्षाही गंभीर दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा आहे. गेल्या ४८ दिवसांत एक थेंबही पाऊस पडला नाही. त्यामुळे उभी पिके करपून जात आहेत. त्याच धास्तीने महिनाभरात मराठवाड्यात ३४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यंदा समाधानकारक पाऊस पडेलच, याच आशेवर राहिल्यामुळे सरकार प्रशासनाने कृत्रिम पावसाच्या पर्यायावर विचारही केला नाही. आता तर कृत्रिम पाऊस पाडण्याची वेळही निघून गेली आहे, असे हवामानतज्ज्ञ सांगतात. प्रशासनाची भिस्त अजूनही परतीच्या पावसावर आहे. हंगामातील पावसाने दिला तसाच दगा परतीच्या पावसानेही दिला तर मराठवाड्यात गत वर्षीपेक्षाही गंभीर स्थिती उद््भवणार आहे. 

३५ लाख शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी नोंदणी केली आहे, अशी नोंद विभागीय आयुक्तांनी सरकारकडे पाठवलेल्या अहवालात आहे. सरकारकडे याबाबत नियोजन नसल्याने ही परिस्थिती असल्याचे मत तज्ज्ञांसह लोकप्रतिनिधींनी व्यक्त केले आहे, तर हवामान तज्ज्ञांच्या मते आता कृत्रिम पाऊस पाडण्याचीही वेळ निघून गेली असून चक्क परतीच्या पावसाच्या आशेवर प्रशासन ठाम असल्याचे दिसून आले. मराठवाड्यात यंदा समाधानकारक पाऊस होईल, असा हवामान खात्याचा अंदाज असल्याने तीन वर्षांच्या दुष्काळाचे दु:ख विसरून बळीराजा नव्या उमेदीने पेरणीला लागला होता. मात्र, पावसाने मोठी ओढ दिल्यामुळे मराठवाड्यावर दुष्काळाचे भीषण सावट आहे. जायकवाडी धरण वगळता मराठवाड्यातील सर्वच धरणांची अवस्था भयंकर आहे. काही धरणे शून्य टक्क्यावर आल्याने पिके तर हातची जाणार, शिवाय पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. त्याचा परिणाम बाजारपेठेवर होत आहे. 

- १३२ सर्कलमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस
- १८२ सर्कलमध्ये ५५ टक्के पाऊस 
- जून ते १२ ऑगस्टपर्यंत २९ दिवस पाऊस पडला ४८ दिवस कोरडेच गेले 

उपाययोजना हव्यात 
‘मराठवाड्यातकृत्रिमपावसाचे अनेक प्रयोग फसले. त्यामुळे त्या महागड्या मशीन नकोच, पण दुसरीकडे शासनाने उपाययोजना करायला हवी, तसे होत नाही. मराठवाड्यातील दुष्काळ शासनाने गांभीर्याने घ्यायला हवा.’ -इम्तियाज जलील, आमदार 

दुष्काळाची मागणी करणार 
‘मराठवाड्यातगेल्या४५ पेक्षा अधिक दिवस पाऊस झाला नाही. त्यामुळे जलाशये कोरडी पडत आहेत. ही परिस्थिती गंभीर आहे. याबाबत सरकारकडे तत्काळ दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी करणार आहोत.’ 
-अतुलसावे, आमदार 

परिस्थितीचे गांभीर्य मांडणार 
‘येत्याकाहीदिवसांत पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. त्यानुसार पाऊस आला नाही तर सरकार दरबारी मी कृषिमूल्य समितीचा अध्यक्ष या नात्याने ही गंभीर परिस्थिती मांडणार आहे.’ 
-पाशा पटेल, अध्यक्ष, कृषिमूल्य समिती
 
परिस्थिती गंभीर, पावसाची शक्यता 
मराठवाड्यात गेल्या ४८ दिवसांत पाऊस झाल्याने परिस्थिती गंभीर आहे. तसा अहवाल शासनाला पाठवला आहे. कृत्रिम पावसाचा निर्णय सरकारचा आहे, तो प्रशासकीय पातळीवर होत नाही. १९ ऑगस्टपासून पावसाची शक्यता आहे. त्याने ही परिस्थिती दूर होण्याची आशा आहे. 
- डॉ.पुरुषोत्तम भापकर, विभागीय आयुक्त 

दुष्काळाचा अंदाज घेणारी यंत्रणाच नसल्याने मराठवाड्याचे नुकसान 
पाच वर्षांपासून मी डॉपलर मशीनची मागणी करताेय. सरकार लक्ष देत नाही. आयुक्तालयावर बसवलेले यंत्र काढले. दुष्काळाचा अंदाज देणारे यंत्रच नसल्याने नुकसान होत आहे. या यंत्रामुळे ढगांची घनता कळते. कृत्रिम पावसाची कुठे गरज आहे, कुठे पाडणे शक्य आहे, याचा अंंदाज घेता येतो. हे यंत्र ३० किलोमीटर परिघातील हवामानाचा अंदाज देते. यंत्र नसल्याने कृत्रिम पाऊस पाडण्याचीही वेळ निघून गेलीे, असे हवामान तज्ज्ञ श्रीनिवास औंधकर म्हणाले. 

कापूस, सोयाबीन गेल्यात जमा 
मराठवाड्यातकापूस आणि सोयाबीन पिकांची सर्वाधिक लागवड झाली आहे. एकूण पेरणीच्या ३६ टक्के कापूस, तर ३४ टक्के सोयाबीन लागवड आहे. 
बातम्या आणखी आहेत...