आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समांतरच्या लोकांनी जनतेलाच धरले दोषी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जवाहर कॉलनी परिसरातील वॉर्ड क्रमांक ७७ मध्ये जवाहर कॉलनी, भगवती कॉलनी, भानुदासनगर, शिवनेरी कॉलनी, लोकमित्र पोलिस कॉलनी, न्यू शांतिनिकेतन कॉलनी या भागांचा समावेश होतो. या परिसराला पाणीपुरवठा करण्यासाठी पाण्याची टाकी आहे. काही भागाला ग्रॅव्हिटी पाइपलाइनने पाणीपुरवठा केला जातो. चौथ्या दिवसाला पाणीपुरवठा होत असल्याने येथील नागरिकांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागतो. तसेच पाणी वेळी-अवेळी आणि कमी दाबाने येत असल्याची ओरड या वॉर्डातील महिलांची आहे.
या वॉर्डात अधिकृत नळ कनेक्शन हजार ४० आहेत, तर १७५ अनधिकृत नळ कनेक्शन आहेत. या संपूर्ण वॉर्डाला दोन टप्प्यांत पाणी सोडण्यात येत होते. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून पाण्याची वेळच नसल्याने कधीही पाणी सोडण्यात येते. जवाहर कॉलनी वॉर्डला तीन लाइनमन असून देखील पाण्याची स्थिती अत्यंत खराब आहे. या भागाला पाणीपुरवठा हा कडा ऑफिसच्या बाजूला असलेल्या पाण्याच्या टाकीवरून केला जातो. या टाकीची क्षमता ३२ लाख लिटर असून या टाकीद्वारे पुंडलिक नगर, विद्यानगर या वॉर्डांनादेखील पाणीपुरवठा केला जातो. चौथ्या दिवशी नळाला पाणी येत असल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत असल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले. त्यांना पाण्याचे टँकर मागवावे लागते. पाण्याच्या दररोजच्या त्रासाला कंटाळून आम्हाला स्थलांतर करावे लागेल, असे मतदेखील या वॉर्डातील नागरिकांनी व्यक्त केले.

या परिस्थितीला नागरिकच जबाबदार आहेत
यापरिसरात राहणारे नागरिकच या परिस्थितीला जबाबदार आहेत. नागरिक स्वत:च्या चुकीमुळेच समस्या निर्माण करतात. त्यात समांतरचा काहीही दोष नाही. एकाने लावलेली मोटर पाहून दुसरा लावतो, यामुळे त्यांनाच पाणी कमी मिळते. आमच्याकडे जर पाण्याच्या टाकीची लेव्हलच नसेल तर आम्ही पाणी देणार कुठुन? यामध्ये मोठ्या प्रमाणात राजकारण होत आहे, त्यामुळे समांतरला बदनाम केले जात आहे, असे समांतरचे अधिकारी शिंगारे यांनी सांगितले.

जवाहर कॉलनी परिसरात पाणीपुरवठ्यासाठी टाकी असूनही नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. छाया: दिव्य मराठी

या वॉर्डाचे माजी नगरसेवक सुरेंद्र कुलकर्णी यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत समांतरच्या ढिसाळ कामाचे वर्णन केले. नेत्यांच्या पाठिंब्यामुळे समांतरचे गाडे सुरू आहेत. शहरातील नागरिक खूप सहनशील आहेत, पण आता नागरिकांच्या सहनशीलतेचा बांध सुटला आहे, समांतरमुळे काहीही निष्पन्न होणार नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. वॉर्डाच्या विद्यमान नगरसेविका जयश्री कुलकर्णी यांनीदेखील समांतरच्या कामाची निंदा केली. समांतरच्या लोकांची मुजोरी वाढली आहे, असे त्यांनी सांगितले. वसुली, मीटर लावण्याचे काम तेवढे व्यवस्थित सुरू आहे. आधी नव्याने पाइपलाइन करा आणि मग ही दंडेलशाही करा, अन्यथा प्रखर विरोधाला सामोरे जावे लागेल, असे त्यांनी सांगितले.

काय म्हणतात नगरसेवक?
½शोध
मुख्य अडचण मुख्य उपाय....
चार महिन्यांपूर्वी या वॉर्डात समांतरद्वारे सर्व्हे करण्यात आला होता. त्यानंतर त्या सर्व्हेचे काय झाले हे कुणालाच माहीत नाही.
मुबलक पाणी मिळत नसल्याची ओरड आहे. यापासूननागरिकांची सुटका होण्यासाठी स्वतंत्र पाण्याची टाकी अथवा संपूर्ण वॉर्डात नव्याने पाइपलाइन करणे गरजेचे आहे. तसेच पाणी सोडण्याची िनश्चित वेळ ठरवणे आवश्यक आहे.
३०४० अधिकृतनळ
१३५अनधिकृतनळ

मनपाच्या काळात अधिकारी भीतीने काम करत
मनपाच्याकाळात इंजिनिअर स्वत: हजर राहून पाण्याचे नियोजन करत होते. कारण त्यांना नागरिक आणि नगरसेवकांची भीती होती. मात्र समांतरच्या लोकांना नागरिकांची काळजीच नसल्याने ते पाणी सोडण्याच्या वेळा पाळत नाहीत असे "दिव्य मराठी'च्या निदर्शनास आले.

नळांची स्थिती
अनेकदा पाण्याचे टँकर मागवावे लागते. या परिसरात अद्याप औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटीकडून पाण्याचे मीटर बसवण्यात आलेले नाहीत.
औरंगाबाद शहराचे फक्त नाव मोठे लक्षण खोटे अशी गत झाली आहे. शहराची नेतेमंडळी फक्त निवडणुकांपुरतीच आपलीशी वाटतात. समांतरमुळे हे शहर सोडून जाण्याशिवाय पर्याय नाही. रुक्मिणीचव्हाण

फक्त ४५ मिनिटे पाणीपुरवठा होतो. तोही चौथ्या दिवशी. आज अनेकांकडे भाडेकरू आहेत. एवढ्या पाण्यात कसे भागवणार, असा नेहमीचाच प्रश्न आहे. गयाबाई
कीर्तिकर

पाण्यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यावरून राजकारण आणि पैसे उकळण्याचा जो प्रयत्न समांतरच्या नावाने सुरू आहे, तो आता या नेतेमंडळींनी थांबवावा. अलका
फुलंब्रीकर

काय म्हणतात नागरिक
आम्हालापाण्यासाठी मोटार लावावी लागते. त्याशिवाय घरात पाणीच येत नाही. समांतर फक्त दिखावा आहे. त्रास तर नेहमीचाच झाला आहे. शोभा
राठोड