आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद - तुमचे पैसे खाली पडले आहेत, असे म्हणून निवृत्त डीवायएसपी बाळासाहेब खिल्लारे (रा. समतानगर) यांच्या कारमधील बॅग लांबवण्याचा प्रयत्न करणार्या भामट्याला हॉटेल वर्हाडीचे मालक प्रफुल्ल रोंगे यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. हा प्रकार गुरुवारी दुपारी 12.30 वाजता बाबा पेट्रोल पंप चौकात घडला.
घडलेल्या प्रकाराबाबत हॉटेल मालक रोंगे यांनी विशद केलेली माहिती त्यांच्याच शब्दांत : ‘मी दुपारी साडेबाराच्या सुमारास हॉटेलबाहेर उभा होतो. हॉटेलसमोर झायलो कार उभी होती. कारमधील गृहस्थ बाहेर उभे असताना त्यांच्या कारजवळ दोघे आले. त्यातील एकाने मातीवर दहा रुपयांच्या सुमारे दहा नोटा पसरवल्या. हा प्रकार मी बघत होतो. दरम्यान, एकाने त्यांना तुमच्या नोटा खाली पडल्याचे सांगितले. ते गृहस्थ नोटा उचलण्यासाठी वाकताच एकाने पाठीमागचा, तर दुसर्याने समोरचा दरवाजा उघडला. कारमधील बॅग हाती पडताच पळ काढला. मी हॉटेलमधील दोघांना आवाज देऊन पाठलाग सुरू केला. मिनिडोरमध्ये बॅग फेकून पळ काढणार्या या चोरट्यास हॉटेल रविराजसमोर पकडले आणि वाहतूक शाखेचे संघराज दाभाडे यांच्या स्वाधीन केले.’
खिल्लारे यांनी तक्रार देण्यास नकार दिला आहे. मात्र, घटनेची नोंद करत पोलिस चोराच्या सहकार्याचा शोध घेत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.