आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीड लाखांची घरफोडी करणारे चोरटे जाळ्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर - भरदिवसा घरफोडी करून १ लाख १८ हजार रुपये किमतीचे मुद्देमाल लंपास करणाऱ्या दोन चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. स्थानिक ग्रामीण गुन्हे शाखा व वैजापूर पोलिसांनी ही संयुक्तिक कारवाई केली.

शेख लियाकत शेख बाबूलाल (२६,रा शिवनी ता.जि. बीड ह.मु. दौलताबाद) , किशोर तेजराव वाळवे (२५ रा. मोठा मेरा ता. चिखली, जि. बुलडाणा) असे पोलिसांनी शिताफीने मुसक्या आवळलेल्या सराईत चोरट्यांची नावे आहेत. ५ जुलै रोजी शहरातील लक्ष्मीनगर परिसरांतील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयासमोरील रहिवासी नंदकुमार परसराम गायकवाड हे कुटुंबासह बाहेर गेले होते. दरम्यान या दोन्ही चोरांनी संधी साधून कडी कुलूप तोडून १ लाख १८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख १५ हजारांची रोकड पळवली. पोलिसांनी तपासाचे चक्रे फिरवून सराईत चोरांना पकडण्याची कारवाई केली. अटक केलेल्या चोरट्यांनी चोरी केल्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून पाच तोळे सोने जप्त केले. तसेच गंगापूर येथे दोन ठिकाणी चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली.