आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२० मिनिटांत ११ लाखांची घरफोडी करणारे जाळ्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - बजरंग चौकातील गणेश कोंडावार यांच्या बंगल्यातून अवघ्या २० मिनिटांत ११ लाख रोख आणि दीड लाखाचे सोने लांबवणाऱ्या गुन्हेगारांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या. आठ दिवसांपूर्वी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आवारात संशयितरीत्या फिरत असताना चौघांना ताब्यात घेतले होते. त्यांची चौकशी केली असता त्यांनी घरफोडी केल्याची कबुली दिली. सरवर शहामनवर शहा (३७, रा. रहेमानिया कॉलनी), मनोज ऊर्फ महेंद जनार्दन मोरे (२५, रा. ब्रिजवाडी) अशी आरोपींची नावे आहेत.
हे दोघे या भागात भंगार चोरीसाठी फिरत होते. तेवढ्यात एका घराला कुलूप दिसले. त्यांनी कुलूप तोडून चोरी केली होती. त्यांच्याकडून चोरीला गेलेले लाख ५८ हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे कुटुंबीय झोपलेल्या बेडरूमच्या दरवाजाला बाहेरून कडी लावून चोरट्यांनी ऐवज पळवला होता. पहाटे वाजून ५० मिनिटांनी अनिकेत कोंडावार बहिणीला सोडण्यासाठी रेल्वेस्टेशनला गेले. या वेळी दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोर घरात शिरले. १२ सप्टेंबर रोजी रात्री गुन्हे शाखेचे पथक गस्त घालत असताना त्यांना शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ हे आरोपी दिसले. पोलिस उपनिरीक्षक अमित बागूल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दोघांना ताब्यात घेतले, तर दोघे पसार झाले. ब्रिजवाडीतील देवा चंद्रशेखर (रा. प्रगती कॉलनी), रवी गायकवाड (रा. ब्रिजवाडी) यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे एक सुरा, फायटर सापडले. पळून गेलेल्या दोन जणांबाबत विचारले असता गुरमित ऊर्फ टॉम कलिम ऊर्फ कल्या (रा. काली बस्ती) अशी त्यांची नावे असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिस आयुक्त अमितेशकुमार, उपायुक्त संदीप आटोळे, सहायक आयुक्त खुशालचंद बाहेती, पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमित बागूल, पोलिस उपनिरीक्षक अनिल वाघ, नितीन मोरे, विलास वाघ, सुनील पाटील, देवचंद महेर, मनमोहन कोल्लमी, संतोष मुदिराज यांनी ही कारवाई केली.
बातम्या आणखी आहेत...