आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चार्ली पोलिसांनी पाठलाग करून चोरट्याला पकडले, दोघे पसार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सोमवारीमध्यरात्री उल्कानगरी परिसरात मोठी घरफोडी करण्यासाठी जमलेल्या अट्टल घरफोड्यांच्या टोळीतील एकाला जवाहरनगर पोलिस तसेच चार्लीं पोलिसांनी अटक केली. दोन चोरटे मात्र पळाले. शुभम विलास सोनवणे (२०, रा. जयभवानीनगर)असे अटकेतील चोरट्याचे नाव असून शुभम भिकुलाल जाट (२१, रा. शिवाजीनगर) आणि सचिन उत्तम कळसकर (३२, रा. जयभवानीनगर) अशी पसार आरोपींची नावे आहेत.

जवाहरनगर ठाण्याचे उपनिरीक्षक आहेर, त्यांचे सहकारी चार्ली सोमवारी रात्री गस्तीवर असताना खबऱ्याकडून सूतगिरणी चौकातील एसबीएच एटीएमसमोर तीन युवक संशयितरीत्या उभे असल्याची माहिती मिळाली. पोलिस तत्काळ सूतगिरणी चौकात पोहोचले. पोलिस बघताच तिघांनीही दुचाकीवरून धूम ठोकली. पोलिस पाठलाग करीत असल्याने पकडले जाण्याची शक्यता पाहता दुचाकीवरील दोघे उडी मारून अंधारात पळून गेले. दुचाकी चालक शुभम मात्र पोलिसांना सापडला. त्याच्याकडून चाकू, टॉमी, दोरी, मिरची पूड असे साहित्य जप्त करण्यात आले. उल्कानगरीत चोरी करण्याचा डाव होता, अशी कबुली त्याने दिली. हेडकॉन्स्टेबल हिवाळे यांनी तक्रार दिल्यानंतर जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. फारुक देशमुख, माणिक हिवाळे, पांडुरंग तुपे, संदीप देशमुख, विनोद गायकवाड, प्रवीण बळीराम, राजेंद्र बडे आदींनी ही कारवाई पार पाडली.

२० हजार रुपये बक्षीस
उल्कानगरीमध्येहोणारी घरफोडी पोलिसांच्या समयसूचकतेने टळली. तसेच पकडण्यात आलेल्या शुभमकडून अधिक गुन्हे उघड होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांच्या कामगिरीबद्दल आयुक्त अमितेशकुमार यांनी पथकाचा सत्कार करून २० हजार रुपये बक्षीस दिले.
बातम्या आणखी आहेत...