आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खुलताबादेत चोर-पोलिसांचा पाठशिवणीचा खेळ रंगला; सिनेस्‍टाइल पाठलाग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागरिकांनी पोलिस ठाण्‍यात केलेली गर्दी - Divya Marathi
नागरिकांनी पोलिस ठाण्‍यात केलेली गर्दी
खलताबाद - शहरात सोमवारी रात्री दोन ठिकाणी चोरी करून पळ काढणाऱ्या चोरट्याला पोलिस व नागरिकांनी पाठलाग करून पकडले. त्यांच्याकडून रोख रकमेसह चोरलेले मोबाइल (भ्रमणध्वनी) जप्त करण्यात आले आहे. जहीर अहेमद अल्ताफ अहेमद (२४, कुंभारवाडा गल्ली नं.१, कुदवे रोड, मालेगाव) असे पकडलेल्या चोरट्याचे नाव आहे. या चोरट्यांकडून अनेक ठिकाणचे चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

खुलताबाद शहरातील कमान मोहल्ला येथील शौकतअली यांच्या घरात सोमवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास चोरी झाली. यात चोरट्याने चार्जिंगला लावलेला मोबाइल व पँटची खिशातील रोख रक्कम काढून घेत घराबाहेर पडण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान शौकत यांचा मुलगा सय्यद सद्दरअली याच्या पायाला त्याची लाथ लागली. त्या वेळी तो चोर चोर म्हणून ओरडला असता घरातील मंडळी जागी झाली. आरडाअोरड करेपर्यंत चोरट्यांनी पोबारा केला होता. त्यानंतर पोलिसांना मिळताच त्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. त्या चोराचा शोध घेत असतानाच त्या चोरट्यांनी पटेल मंडली भागातील शेख रियाज यांच्या घरी त्याने चोरी केली. त्या ठिकाणाहूनही मोबाइल व रोख रक्कम घेऊन पोबारा केला. नागरिकांनी आरडाओरड केली असता ग्रामस्थ जमा झाले. त्यांनीही त्या चोरट्याचा शोध सुरू केला. नागरिक व पोलिसांनी रात्र डोक्यावर घेत शहरातील कानाकोपरा पिंजून काढला, परंतु चोर सापडला नाही. यादरम्यान गस्तीवर असलेले पोलिस निरीक्षक डी. जे. राजपूत, योगेश नाडे, शेख शकील, सुनील साळुंके, अभिमन्यू भिसे यांना चोर पळत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी पाठलाग करून पकडले. त्याच्याकडून रोख रकमेसह ९ हजार रुपयांचाऐवज जप्त करण्यात आला.
चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश
खुलताबादमधील भद्रा मारुती परिसरात यापूर्वी १८ ऑगस्ट रोजी घरफोडी झाली होती. या ठिकाणाहून चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लांबवली होती. त्या वेळी पोलिसांनी किशोर तेजराव वायाळ, संदीप भिकाजी बिगने, सुरत येथील सोनार कन्नुभाई परभतभाई गजेरा यांना ताब्यात घेतले होते. आता रविवारी मध्यरात्री झालेल्या चोरीतील चोरटा जहीर अहेमद अल्ताफ अहेमद (२४, कुंभारवाडा गल्ली नं.१, कुदवे रोड, मालेगाव) यासही पोलिसांनी ताब्यात घेत गजाआड केले आहे.