आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवाजीनगरात एकाच रात्री पाच दुकाने फोडली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शिवाजीनगरात चोरट्यांनी एकाच रात्री पाच दुकाने फोडली. यात तीन दुकानांतील रोकड आणि साहित्य लंपास करण्यात आले. या चोरट्यांना काही नागरिकांनी पकडण्याचा प्रयत्नही केला. मात्र, ते पळून जाण्यात यशस्वी ठरले.

शिवाजीनगर येथील पोलिस चौकीपासून केवळ 25 फुटांवरील राजधानी साडी सेंटर आणि सात्त्विक ब्युटी पार्लरच्या शटरचे कुलूप बुधवारी रात्री तोडण्यात आले. ब्युटी पार्लरमधून काही सौंदर्य प्रसाधने, रोकड तसेच साडी सेंटरमधून पाचशे ते सहाशे रुपयांची चिल्लर चोरट्यांनी पळवली. त्यानंतर चोरट्यांनी याच रोडवरील आईस्क्रीम पार्लर फोडले. यानंतर कमलबाई बरथरे यांच्या किराणा दुकानाचे शटर उचकटवून तेलाचे डब्बे आणि 12 हजारांचे साहित्य पळवले. बरथरे यांच्याच दुकानासमोरील मच्छिंद्र उबाळे यांचे पुस्तकाचे दुकान फोडून पळून जाणार्‍या चोरट्यांचा काही नागरिकांनी पाठलाग केला. मात्र, ते पसार झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस व्हॅन घटनास्थळी दाखल झाली. 2 ऑगस्ट रोजीरात्री चोरट्यांनी याच परिसरात तीन दुकाने फोडली होती. जवाहरनगर पोलिस पुढील तपास करीत आहेत.