आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टिळकनगरात अभियंत्याच्या घरी दीड लाखाची घरफोडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरात घरफोड्यांचे सत्र सुरूच असून मंगळवारी सायंकाळी निवृत्त अभियंता जगददयाल गिरधारीलाल जैस्वाल (६४) यांचे टिळकनगर, शहानूरवाडी परिसरातील घर फोडत एक लाख ५४ हजारांचा ऐवज लंपास करण्यात आला. मागील आठ दिवसांतील ही सातवी घरफोडी आहे. विशेष म्हणजे जुलै रोजी श्रेयनगर येथे झालेली घरफोडी आणि टिळकनगरमधील घरफोडीत बरेच साम्य आहे.

जैस्वाल मंगळवारी सायंकाळी कामानिमित्त सिटी चौक येथे गेले होते, तर त्यांच्या पत्नी मेडिकलमध्ये गेल्या असताना सायंकाळी ते या वेळेत ही चोरी करण्यात आली. चोरटे समोरच्या दाराचे कुलूप तोडत घरात घुसले कपाटातील ५० हजार रुपये रोख आणि एक लाख चार हजारांचे दागिने घेऊन पसार झाले. जैस्वाल घरी परतल्यानंतर चोरी झाल्याचे उघड झाले. जवाहरनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

चोरटे १८ ते २० वयाचे
जैस्वालयांच्या पत्नी घरी परतत असताना त्यांनी चोरट्यांना पाहिले होते. त्यांनी पोलिसांना म्हटले आहे की, चोरट्यांच्या पाठीवर काळ्या रंगाची बॅग होती. त्यांचे वय अंदाजे १८ ते २० असावे. उस्मानपुरा, श्रेयनगरातील संदीप छगनराव कदम यांच्या घरी जुलै रोजी चोरी झाली होती. त्या चोराने बाजूच्या घरात राहणाऱ्या एका महिलेला पत्ता विचारून चोरी केली होती. त्याचे वर्णनदेखील या चोरट्याशी मिळतेजुळते असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

निवृत्त अभियंता जगददयाल जैस्वाल यांचे टिळकनगर परिसरातील घर फोडण्यात आले.
पावसाने दडी मारल्यामुळे ग्रामीण भागात बेरोजगारी वाढली आहे. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक अशी कामे करू शकतात, असा पोलिसांचा अंदाज आहे. शहरातील अनेक अनधिकृत हॉटेल्स बंद केल्या असून बेकायदेशीर वाहतुकीवर लगाम लावण्यात आल्याने बेरोजगारी वाढली आहे.
बातम्या आणखी आहेत...